पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत सूर्यदत्ता पब्लिक स्कूलने घवघवीत यश संपादन केले. यंदा शाळेचा निकाल 100 टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल 98 टक्के, कला व वाणिज्य शाखेचा निकाल 93 टक्के लागला आहे, असे प्राचार्या किरण राव यांनी सांगितले. तसेच सूर्यदत्ता ज्युनिअर कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के, कला शाखेचा 96 टक्के, वाणिज्य शाखेचा 93 टक्के, तर एमसीव्हीसीचा निकाल 100 टक्के लागला आहे, असे प्राचार्या वंदना पांडे यांनी सांगितले.
सुर्यदत्ता ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक या सर्वांचे अभिनंदन केले. डॉ. चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या विविध उपक्रमाचा फायदा झाला. विविध संसथांबरोबर सामंजस्य करार, डिजिटल लर्निंग, लाईव्ह सेमीनार्स आणि इतर उपक्रम विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरले. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिगत मार्गदर्शन, सल्ला व समुपदेशन केल्याचा हा परिपाक आहे.’