Surbhi Jyoti: आई झाल्यानंतर सुरभी ज्योती पुन्हा चर्चेत; व्हिंटेज मॅटर्निटी फोटोशूटवर चाहत्यांची पसंती
Surbhi Jyoti या फोटोशूटमध्ये सुरभीने पोलका डॉट डिझाइनचा आकर्षक वनपीस ड्रेस परिधान केला होता. तिचा हा साधा पण स्टायलिश लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.

Surbhi Jyoti: लोकप्रिय टीव्ही मालिका ‘नागीण ३‘(Nagin 3) मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी ज्योतीच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. वयाच्या ३८ व्या वर्षी सुरभी पहिल्यांदाच आई झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी समोर येताच चाहते आणि सेलिब्रिटींकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

surbhi jyoti Maternity Photoshoot
१३ जून २०२६ रोजी सुरभी ज्योती आणि तिचा पती सुमित सुरी यांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं. या आनंदाच्या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. (Surbhi Jyoti)
आई होण्याचा प्रवास प्रत्येक महिलेसाठी खूप खास असतो आणि सुरभीनेही हा सुंदर प्रवास आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. गरोदरपणात तिने सोशल मीडियावर अनेक खास मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो पोस्ट केले होते. त्यापैकी तिच्या व्हिंटेज स्टाईल फोटोशूटची विशेष चर्चा रंगली होती. (Surbhi Jyoti)

surbhi jyoti Maternity Photoshoot
या फोटोशूटमध्ये सुरभीने पोलका डॉट डिझाइनचा आकर्षक वनपीस ड्रेस परिधान केला होता. तिचा हा साधा पण स्टायलिश लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.
या लूकला अधिक उठावदार बनवण्यासाठी तिने गळ्यात मोत्यांची माळ घातली होती. तसेच डोक्यावर काळ्या रंगाची नेट फॅब्रिकची कॅप आणि हातात नेटचे ग्लोव्हज परिधान केले होते. त्यामुळे तिच्या संपूर्ण लूकला एक वेगळीच व्हिंटेज झलक मिळाली होती. (Surbhi Jyoti)

surbhi jyoti Maternity Photoshoot
फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावरचा गरोदरपणाचा नैसर्गिक ग्लो स्पष्टपणे दिसून येत होता. तिचं हास्य, आत्मविश्वास आणि आनंद चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला.आई झाल्याची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही सुरभी आणि सुमित यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Surbhi Jyoti)

surbhi jyoti Maternity Photoshoot
सुरभी ज्योती ही हिंदी दूरचित्रवाणी विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. ‘नागीण ३’सह अनेक मालिकांमधील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. आता तिच्या आयुष्यात एका नव्या भूमिकेची म्हणजेच आईपणाची सुरुवात झाली आहे. (Surbhi Jyoti)

surbhi jyoti Maternity Photoshoot
सध्या तिचे मॅटर्निटी फोटो आणि आई झाल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. चाहतेही तिच्या या नव्या प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा देत आहेत. (Surbhi Jyoti)





