Supriya Sule : अद्याप मनसेमध्ये त्यांनी आम्हाला पाठवले नाही; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला
Supriya Sule : आमचा 8 खासदारांचा व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे. आम्हाला टीव्हीवर रोज नवीन पक्षात पाठवले जात आहे. आम्ही त्या ग्रुपवर गंमतीने बोलतो की, आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचे बाकी राहिले आहे.

Supriya Sule : आमचा 8 खासदारांचा व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे. आम्हाला टीव्हीवर रोज नवीन पक्षात पाठवले जात आहे. आम्ही त्या ग्रुपवर गंमतीने बोलतो की, आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचे बाकी राहिले आहे. (Supriya Sule)
आम्हाला कमोडिटी करून ठेवले आहे. याने अस्वस्थ आहोत, दुर्दैव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आता इंटरनॅशनल करून टाका, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगाविला. (Supriya Sule)
राज्यात काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विलीनीकरणाच्या तसेच पक्षांतराच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. या सर्व चर्चांवर स्वतः सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. (Supriya Sule)
नाशिकमध्ये एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या, फुटण्यासाठी आम्ही निवडून आलो नाही. तर पॉलिसी ठरवण्यासाठी आम्ही निवडून आलो आहोत. गेल्या दोन दिवसांपासून मी जरा व्यथित आहे. कोण सूत्र आहेत मला माहिती नाही. आमच्याबाबत मीडियात काही बातम्या सुरू आहेत. (Supriya Sule)
माझा पृथ्वीराज बाबांशी फक्त माझ्या लेकीच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी संपर्क झाला होता. त्यांना आमचा कोणता खासदार भेटला हे मला माहीत नाही. आमचा कोणताही खासदार बाहेर जाऊन उलटसुलट बोललेला नाही. (Supriya Sule)
आमचा पक्ष एकसंध आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाचे आमदार अमोल कोळे यांच्या विधानाचीही चर्चा रंगली होती. त्यावर त्या म्हणाल्या की, अमोल दादा त्यांच्या शैलीत बोलले होते, पण त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांनी सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Supriya Sule)





