Supriya Sule On Rohit Pawar : “अजितदादा नसण्याचं दुःख कधीच भरून निघणार नाही, रोहितची अस्वस्थता साहजिक”; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule On Rohit Pawar : 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी सविस्तर चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.'
Supriya Sule On Rohit Pawar : अजित पवार यांच्या निधनावर त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवारांच्या या आरोपावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“रोहितची अस्वस्थता साहजिक आहे. मुलांना असं वाटतं. त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत. रोहितने जे प्रश्न मांडलेत, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याने त्याची भावना पारदर्शकपणे मांडली. मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे. सविस्तर चौकशी होईल देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी सविस्तर चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. त्या चौकशीची आपण वाट पाहूयात,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“सुनेत्रा वहिनी पालकमंत्री झाल्याचा आनंद आहे. मात्र अजितदादा नसल्याचं दुःखही आहे. अजितदादा नसण्याचं दुःख कधीच भरून निघणार नाही. आजही खरं वाटत नाही की अजितदादा आपल्यात नाही. वहिनींवर आता नवीन मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू अशी माझी परिस्थिती आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Bhumi Pednekar: “सोशल मीडिया म्हणजे दलदल… माझ्याबाबत जे झालं ते ट्रोलिंग नव्हे, सरळ बुलिंग होतं”
“आमच्या बॅचमध्ये एवढ्या लहान वयात दादा ज्या पद्धतीने गेला, दादाचं जाण्याचं वय नव्हतं. इतक्या वर्षात दादाला कधी थकलेला, आजारी बघितला नाही. आज दादा आपल्यात नाही हे खरं वाटत नाही. सध्या आमचं कुटुंब खूप अडचणीच्या काळातून जात आहोत. एकमेकांना आधार देत आम्ही पुढे जात आहोत,” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित पवार 12 तारखेला विलिनीकरणाची घोषणा करणार होते, असं शरद पवार बोलले. त्या प्रश्नावरही सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं. “या गोष्टी आयुष्यात होत असतात. आज दादा नाहीत. मला काही जुनी उणी-दुणी काढायची नाहीत. तो माझा मोठा भाऊ होता. माझ्या दादामध्ये आणि माझ्यात जी काही चर्चा झाली, आज माझा भाऊ जिथे असेल तिथे त्याला माहित आहे. दादाच्या इच्छेने, आशिर्वादने पुढे काय होतं ते पाहू” , असं सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं.
शरद पवारांच्या तब्येतीबाबत दिली माहिती
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती देत सांगितले की, “शरद पवारांची तब्येत खूप चांगली आहे. रूबी हॉल रूग्णालयाच्या स्टाफचे मी आभार मानते. शरद पवारांना उद्या रुग्णालायातून डिस्चार्ज मिळू शकतो. शरद पवार जेव्हा हॉस्पिटलमधे होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केले होते. अजितदादा गेल्यानंतरच्या काळातही या सगळ्यांनी आमची साथ दिली त्याबद्दलही मी सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आभार मानते,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा:
Bhumi Pednekar: “सोशल मीडिया म्हणजे दलदल… माझ्याबाबत जे झालं ते ट्रोलिंग नव्हे, सरळ बुलिंग होतं”





