Bhumi Pednekar: “सोशल मीडिया म्हणजे दलदल… माझ्याबाबत जे झालं ते ट्रोलिंग नव्हे, सरळ बुलिंग होतं”
एका मुलाखतीत भूमीने (Bhumi Pednekar) सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल स्पष्ट मत मांडले. ती म्हणाली, “सोशल मीडिया ही एक दलदल आहे. इथे खूप निगेटिव्हिटी, फेक न्यूज आणि द्वेष आहे. माझ्याबाबत जे घडलं ते फक्त ट्रोलिंग नव्हतं, ती सरळ बुलिंग होती. आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.”

Bhumi Pednekar: अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) सध्या तिच्या ‘दलदल’ या वेब सिरीजमुळे चर्चेत आहे. या सिरीजमध्ये ती पोलीस अधिकारी रीटा फरेरा ही भूमिका साकारत आहे.
महिलांच्या प्रश्नांवर ठामपणे भूमिका मांडणारी अभिनेत्री म्हणून भूमी ओळखली जाते. ‘दम लगा के हईशा’, ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘सांड की आंख’, ‘भीड़’, ‘भक्षक’ अशा चित्रपटांतून तिने महिलांच्या मुद्द्यांना आवाज दिला आहे.
एका मुलाखतीत भूमीने सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल स्पष्ट मत मांडले. ती म्हणाली, “सोशल मीडिया ही एक दलदल आहे. इथे खूप निगेटिव्हिटी, फेक न्यूज आणि द्वेष आहे. माझ्याबाबत जे घडलं ते फक्त ट्रोलिंग नव्हतं, ती सरळ बुलिंग होती. आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.”
महिलांविरुद्ध होणारी हिंसा हा आजही गंभीर प्रश्न असल्याचं भूमीचं मत आहे. “2026 मध्येही महिलांवर अत्याचार होत आहेत, ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. रेप किंवा महिलांवरील गुन्हे या रुटीन बातम्या कशा होऊ शकतात?” असा प्रश्न तिने केला. चित्रपटाच्या सेटवर तिला फारसे वाईट अनुभव आले नाहीत, पण व्यवसाय क्षेत्रात सुरुवात करताना तिला कमी लेखलं गेल्याचं तिने सांगितलं.
सोशल मीडियावरील टीकेबद्दल बोलताना ती म्हणाली, “पब्लिक फिगर म्हणून मतभेद स्वीकारते, पण संवेदनशीलता हवी. ‘I hope you will die’ असं म्हणणं म्हणजे मत व्यक्त करणं नाही, ती बुलिंग आहे.” या काळात कुटुंबाने, विशेषतः बहिण समीक्षाने, तिला खूप साथ दिली असंही तिने सांगितलं.
वडिलांच्या आजारपणाचा काळ आणि सोशल मीडियावरील नकारात्मक अनुभव हे तिच्यासाठी ‘दलदल’सारखे क्षण होते, असं भूमीने नमूद केलं. मात्र आध्यात्माकडे वळल्यामुळे तिला मानसिक शांती मिळाली आहे, असं ती म्हणाली.







