धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट सवाल ; म्हणाल्या,”मुंडेंचा राजीनामा…”

Supriya Sule on Dhananjay Munde । बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राजकीय वर्तुळात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. विरोधकांनी आणि सत्ताधारी आमदारांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सतत मागणी होत आहे. पण यावर कोणीही ठोस पावले उचलताना दिसत नाही. याच मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यासोबतच धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी,”धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावे लागेल, असे वक्तव्य केले आहे. याआधी ज्या ज्या वेळेस आरोप झालाय त्यावेळेस नैतिकतेच्या आधारे राजीनामा घेतला आहे. आता राजीनामा मागीतला आहे. पण तेच घेत नाहीत, हे तुम्हाला सरकारला विचारावं लागेल” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
सरसकट कर्जमाफी कधी मिळणार ? Supriya Sule on Dhananjay Munde ।
देवेंद्रजी ऍक्शन मोडवर दिसतात, ते विविध कामात व्यस्त असतात असेही सुळे म्हणाल्या. सरकारने सोयाबीन, कपाशीला हमीभाव देऊ असा शब्द दिला होता असेही सुळे म्हणाल्या. सरसकट कर्जमाफी देऊ असेही सांगितले होते असे सुळे म्हणाल्या. सरकारने संवेदनशीलपणा दाखवावा. आता सुरेश धस, बजरंग सोनवणे यंच्यावर बोललं जात आहे असे सुळे म्हणाल्या. एवढी मोठी सत्ता आल्यावर क्राईम कमी व्हाययला पाहिजे असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. सरकार स्थापन व्हायला वेळ गेला. निवडणुकीमध्ये जो शब्द दिला तो पाळा हीच आमची मागणी असल्याचे सुळे म्हणाल्या. त्यासोबतच दुधाला 40 रुपये दर मिळाला पाहिजे अशी आमची मागणी असून त्यासाठी सरकारला आम्ही पत्र लिहलं पण आमची मागणी मान्य झाली नाही असेही त्यांनी यावेळी म्हटले.
राजकारण वेगळे आणि राजकीय जबाबदारी वेगळी Supriya Sule on Dhananjay Munde ।
राजकारण वेगळे आणि राजकीय जबाबदारी वेगळी. कुटुंब उंबऱ्याच्या आत असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर बोलणं टाळले. देवेंद्र फडणवीस सोडून सरकारमध्ये कुणीच ऍक्शन मोडवर दिसत नाही. पवार साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. सगळ्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे असे सुळे म्हणाल्या. पालकमंत्री पदात नेमकं काय आहे, ?त्याच्यासाठी एवढा वेळ का जातोय? असा सवाल देखील सुळे यांनी यावेळी उपस्थित केला. पालकमंत्रीपदाबाबत एवढी चर्चा आम्ही कधीच ऐकली नाही. एवढी रस्सीखेच का केली जाते. एवढं गुढ याच्यामध्ये काय आहे मला माहित नाही असेही सुळे म्हणल्या.
त्यासोबतच देशात HMPV विषाणू वाढत आहे. सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळेस आमचं सरकार होतं त्यावेळेस राजेश टोपे यांनी खूप चांगलं काम केलं होतं. राज्य सरकारने योग्य उचलणं गरजेचं आहे. असे सुळे म्हणाल्या. दिल्ली निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने योग्य पध्दतीने काम करावं असेही सुळे म्हणाल्या.





