मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर सुप्रिया सुळे संतापल्या,’गृहमंत्रीचं याला जबाबदार..’

मुंबई – जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभरात या घटनेचे पडसात उमटत आहे. अशात विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. यावर माध्यमांशी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्रीचं याला जबाबदार असल्याच आरोप केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणल्या,’तिथे काय झालं हे मला माहित नाही पण जर तिथे चार दिवस आंदोलन चालू होतं तर तिथे इंटेलेजन्स आणि यंत्रणा काय करत होती? एवढी मंत्री आहेत तिथे जाऊ शकले नसते. विरोधकांना नाव ठेवायची फक्त एवढीचं या सरकारच काम आहे. यापैकी का नाही त्यांच्याशी शांततेने चर्चा केली. फक्त विरोधकांना नाव ठेवायंची आणि कामं तर काही करायची नाही राज्यामध्ये. गृहमंत्रलयांनीच याचं उत्तर द्यावं. गृहमंत्रीचं याला जबाबदार असल्याच आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
दरम्यान,जालन्यात मराठा उपोषण आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जनंतर आता राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहे. जालन्यातील आंदोलन अमानुष पद्धतीनं मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा तीव्र निषेध करत मराठा आरक्षण प्रकरणी सरकारनं समाजाचा अंत पाहू नये असा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे. तर गृहखात्याकडून घेतलेली भूमिका ही अतिरेकी भूमिका असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. जालन्यात झालेल्या या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.





