Supriya Pilgaonkar: सुप्रिया पिळगांवकर ‘तू आहेस ना’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Supriya Pilgaonkar: अभिनेता सिद्धार्थ बोडके दिसणार प्रमुख भूमिकेत

Supriya Pilgaonkar: अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर ‘तू आहेस ना’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात अभिनेता सिद्धार्थ बोडके देखील प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
माणसांमधील नातेसंबंध आणि दोन आयुष्यांना अनपेक्षितपणे जोडणाऱ्या एका अनोख्या बंधाची हृदयस्पर्शी गोष्ट या चित्रपटातून समोर येणार आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन दिपक गावडे यांनी केलं आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
या चित्रपटाविषयी बोलताना सुप्रिया पिळगांवकर म्हणल्या की, “आजच्या काळात ‘तू आहेस ना’ या चित्रपटाचा विषय आणि त्याचं महत्त्व मला अभिनेत्री म्हणून विशेष भावलं. चित्रपटात या विषयाची केलेली मांडणी त्याचबरोबर मी साकारणारी व्यक्तिरेखा, यामुळेच मी या चित्रपटाशी जोडलं जाण्याचा निर्णय घेतला.”
तर सिद्धार्थ बोडके म्हणाला की, ‘तू आहेस ना’ या चित्रपटाने मला भावनांचे विविध पैलू असलेली व्यक्तिरेखा साकारण्याचं आव्हान दिले. अभिनेता म्हणून मला अशा प्रकारची भूमिका साकारण्याची नेहमीच इच्छा होती. ‘देवमाणूस’नंतर लव फिल्म्सबरोबरचा हा माझा दुसरा प्रोजेक्ट आहे.
एका वेगळ्या कथेसाठी आणि स्वतःमधील अभिनयाचा नवा पैलू शोधण्याची संधी देणाऱ्या या टीमसह पुन्हा काम करण्यासाठी मी उत्सुक होतो.” दरम्यान, हा चित्रपट २०२७ मध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:





