Supreme Court on Nawab Malik । महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना दिलेला अंतरिम दिलासा सध्या कायम राहणार आहे. त्याच्या नियमित जामिनावर मुंबई उच्च न्यायालय आदेश देत नाही तोपर्यंत हा दिलासा कायम राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 11 ऑगस्ट 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत फेब्रुवारी २०२२ मध्ये मलिक यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. तेव्हापासून नवाब मलिक बाहेर आहेत. प्रकृतीच्या कारणांमुळे मलिकांना मिळालेला वैद्यकीय जामीन Supreme Court on Nawab Malik । नवाब मलिक यांना ईडीनं 2022 मध्ये गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. नंतर ऑगस्ट 2023 मध्ये ते अटीशर्तींसह जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते. प्रकृतीचं कारण देत जामीन मिळावा, अशी मागणी तेव्हा त्यांनी केलेली. क्रूझ ड्रग्ज प्रकरणादरम्यान मलिक चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आरोपी होता. मात्र, एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे मलिक तेव्हा चर्चेचा विषय ठरले होते. मलिक नेमके कोणत्या राष्ट्रवादीत? Supreme Court on Nawab Malik । नवाब मलिक यांना गोवावाला कंपाऊंड प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली होती. नवाब मलिक तरुंगात असताना राज्याच्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडल्या. त्यापैकी एक मोठी घडामोड म्हणजे, नवाब मलिक ज्या पक्षाचा हिस्सा होता. त्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट. अजित दादांनी वेगळा निर्णय घेतला आणि भाजपच्या साथीनं महायुतीत सहभागी झाले. तेव्हापासूनच राष्ट्रवादी दोन गटांत विभागली गेली. एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट). नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आले, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांत विभागलेली होती. त्यामुळे ते कोणत्या गटात सामील होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं. सुरुवातीला त्यांनी तटस्थ भूमिका घेतली. नंतर मात्र त्यांनी अजित पवार गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, महायुतीतील नेत्यांनी नवाब मलिकांना जोरदार विरोध केला. यामध्ये प्रामुख्यानं भाजप नेत्यांचा सहभाग होता. त्यामुळे नवाब मलिक नेमके कोणाचे? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला.