सर्वोच्च न्यायालयात दोन नवीन न्यायाधीशांची नियुक्ती ; न्यायमूर्ती कोतीश्वर सिंह अन् आर महादेवन यांच्या नावाची घोषणा

Supreme Court Judge Appointment । सर्वोच्च न्यायालयाला दोन नवीन न्यायाधीश मिळाले असून, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात मंजूर झालेल्या न्यायाधीशांची संख्या पूर्ण झाली आहे. न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली आहे.केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीची घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या.
न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या पुन्हा 34 वर
न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांना अद्याप शपथ द्यायची आहे. शपथविधी पूर्ण झाल्यानंतर, सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या पुन्हा 34 होणार आहे. जी न्यायालयातील मंजूर कमाल न्यायाधीशांची संख्या आहे. जम्मू-काश्मीरचे सरन्यायाधीश एन कोतीश्वर सिंग हे सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले मणिपूरचे पहिले न्यायाधीश ठरले आहेत. न्यायमूर्ती महादेवन हे सध्या मद्रास उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली न्यायाधीशांची नियुक्ती Supreme Court Judge Appointment ।
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भारताच्या राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून आणि भारताच्या माननीय सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालील व्यक्तींना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केले आहे.” ” त्यांनी त्यांच्या ट्विटसह एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या नावांचा समावेश आहे. त्यात ते सध्या कोणत्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, असेही नमूद केले आहे.





