Eknath Shinde : आंदोलनाला पाठिंबा हा राजकीय अजेंडा.! एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषण आंदोलनातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न ठाकरेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला.

Eknath Shinde – पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषण आंदोलनातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न ठाकरेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला.
तसेच, सरकारविरोधातील आंदोलनांना पाठिंबा देण्याचा ठाकरेसेनेचा इतिहास असल्याचेही त्यांनी म्हटले. नीट परीक्षेतील कथित अनियमिततेबाबत दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यावर शिंदे यांनी हे विधान केले. (Eknath Shinde)
देशाला विकासाच्या मार्गावर नेणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध अशांतता निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. शिंदे म्हणाले, ते नेहमीच सरकारविरोधातील आंदोलनांना पाठिंबा देतात. ते श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेशचा संदर्भ देत असतात. (Eknath Shinde)
आता ते या आंदोलनाचा राजकीय फायदा कसा घेता येईल, याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना देशात आणि राज्यात अराजकता निर्माण करायची आहे आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवायची आहे, पण ते यात कधीच यशस्वी होणार नाहीत, असे शिंदे यांनी सांगितले. (Eknath Shinde)
श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेशमधील अशांततेस तिथली कोलमडलेली अर्थव्यवस्था कारणीभूत होती, याउलट मोदींच्या नेतृत्वाखाली भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. (Eknath Shinde)
देशाची अर्थव्यवस्था वाढत आहे आणि गरीब, शेतकरी, महिला व तरुणांसाठीच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत. तरुणांनी २०१४ नंतरची देशाची प्रगती पाहिली आहे आणि ते पंतप्रधान मोदींच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. (Eknath Shinde)
हिंदुत्व आणि पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या पक्षांशी युती करून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा सोडली असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. (Eknath Shinde)
विधानसभेत हिंदुत्वाचे मुद्दे उपस्थित करणे ही चूक होती असे आधी म्हटल्यानंतर, आता ते हिंदुत्वाविषयी बोलतात आणि रामरक्षा स्तोत्राचे पठण करतात. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी, बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा सोडल्यानंतर ते पुन्हा हिंदुत्वाचे स्थान मिळवू शकत नाहीत, असे ते म्हणाले. (Eknath Shinde





