सुनील शेट्टीला शूटिंगदरम्यान झाली दुखापत; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Sunil Shetty | बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीला शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. अॅक्शन सीनच्या शूटदरम्यान त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली. याबाबत स्वत: सुनील शेट्टीने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.
मुंबईत ‘हंटर’ या वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी चार ते पाच कलाकारांसोबत फाइट सीन करत होता. या सीनदरम्यान लाकडी वस्तू सुनील शेट्टीच्या बरगड्यांना लागली आणि तो जखमी झाला.
सुनिल शेट्टीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर आपल्या तब्येतीबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. “किरकोळ दुखापत झाली असून, काहीही गंभीर नाही. मी पूर्णपणे बरा आहे आणि पुढील शॉटसाठी तयार आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल आभारी आहे,” असे त्याने पोस्टमध्ये म्हंटले आहे. Sunil Shetty |
‘हंटर: टूटेगा नहीं तोडेगा’ हा चित्रपट प्रिन्स धीमान आणि आलोक बत्रा यांनी दिग्दर्शित केला आहे. या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाच्या पहिल्या सीझनमध्ये A.C.P विक्रम सिन्हा या प्रमुख भूमिकेत सुनिल शेट्टी काम करत आहे. याशिवाय ईशा देओल, राहुल देव, बरखा बिश्त, मिहिर आहुजा, टीना सिंग, चाहत तेजवानी, करणवीर शर्मा, सिद्धार्थ खेर, गार्गी सावंत आणि पवन चोप्रा यांच्याही या वेब सिरीजमध्ये प्रमुख भूमिका आहेत. Sunil Shetty |
सुनील शेट्टी लवकरच ‘द लीजेंड ऑफ सोमनाथ’, ‘वेलकम टू द जंगल’, ‘लायन्सगेट’ आणि ‘हंटर 3’ असे महत्त्वाचे प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. त्याचा ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमा २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
“ईडीपासून मुक्ती मिळावी म्हणून भाजपसोबत गेलो”; विधानसभा निवडणुकांदरम्यान भूजबळांकडून दावा; पण…






