Sunil Pal On Alia Bhatt: “जहां है गालियां, वहां है आलिया”; समय रैनाच्या शोमध्ये जाताच आलिया भट्टवर टीका
Sunil Pal On Alia Bhatt: सुनील पाल आणि समय रैना यांच्यातील वाद जुना

Sunil Pal On Alia Bhatt: समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या दुसऱ्या सीझनला सुरुवात झाली असून, या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडला दोन मोठ्या अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.
अभिनेत्री आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ त्यांच्या आगामी ‘अल्फा’ या फिल्मच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून याच निमित्ताने त्या या शोमध्ये उपस्थित होत्या. मात्र समयच्या शोमध्ये जाण्यावरून आलिया आणि शर्वरीला टीकेचा सामना करावा लागत आहे. यातील एका गोष्टीमुळे सुनील पाल यांनी आलिया भट्टवर निशाणा साधला आहे.
सुनील पालची उडवली खिल्ली (Sunil Pal On Alia Bhatt)
‘इंडियाज गॉट लेटेंट २’ च्या पहिल्या एपिसोडदरम्यान समयने सुनील पालची खिल्ली उडवली. समयने एका स्पर्धकाला विचारले होते की, “तू कोणते टूथपेस्ट वापरतोस?” जेव्हा स्पर्धकाने उत्तर दिले, तेव्हा समय म्हणाला, “ते टूथपेस्ट सुनील पालला पण देऊन टाक.”
यावर आलिया हसताना दिसली आणि तिने सांगितले की, जेव्हा समय रैना आणि सुनील पाल कपिल शर्माच्या शोमध्ये गेले होते, तेव्हा तिने तो एपिसोड पाहिला होता.
त्या शोमध्ये समयने सुनील पाल यांना थेट प्रश्न विचारला होता की, “तुम्ही दात का घासता?” आलियाने हा संदर्भ दिल्याने सुनील पाल प्रचंड संतापले. त्यांनी फेसबुक पेजवर, “जहां है गालियां, वहां है आलिया,” अशी खोचक पोस्ट लिहिली. (Sunil Pal On Alia Bhatt)
दरम्यान, सुनील पाल आणि समय रैना यांच्यातील वाद जुना आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या पहिल्या सीझनच्या वेळी सुनील पाल यांनी समयच्या शोमधील भाषेवर आणि अडल्ट कंटेंटवर आक्षेप घेतला होता. आता त्याच शोमध्ये आलियाने दात घासण्यावरून विनोद केल्याने सुनील पाल चांगलेच संतापले. (Sunil Pal On Alia Bhatt)
हेही वाचा:
R. Madhavan : “माझ्यावर एक मोठी जबाबदारीही आली”; आर. माधवनने पद्मश्री पुरस्कार मिळताच मानले आभार






