R. Madhavan : “माझ्यावर एक मोठी जबाबदारीही आली”; आर. माधवनने पद्मश्री पुरस्कार मिळताच मानले आभार
R. Madhavan : आर. माधवनने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

R. Madhavan : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक ‘गणतंत्र मंडप’ येथे दिमाखदार सोहळ्यात पार पडले. या सोहळ्यात महाराष्ट्रातील सात मान्यवरांना विविध क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
यात आर. माधवनचा देखील कला क्षेत्रातील त्याच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यानंतर माधवनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारत सरकारचे आणि चाहत्यांचेही आभार मानले.
आर. माधवनने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, ‘मला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यामुळे खूप आनंद आणि अभिमान वाटत आहे. या सर्वोच्च सन्मानासाठी मी भारत सरकारचे मनापासून आभार मानतो. मी महाराष्ट्र सरकारचाही आभारी आहे, ज्यांनी या पुरस्कारासाठी माझ्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि माझ्यावर विश्वास दाखवला. हा दिवस माझ्या कायम स्मरणात राहील.’
View this post on Instagram
चाहत्यांचेही मानले आभार
चाहत्यांचे आभार मानत माधवनने लिहिले, ‘माझे चित्रपट पाहण्यासाठी, माझ्या भूमिकांवर प्रेम करण्यासाठी आणि इतकी वर्षे मला साथ दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हा सन्मान जितका माझा आहे, तितकाच तुमचाही आहे. तुमच्या याच प्रेमामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे.
या सन्मानासोबतच आता माझ्यावर एक मोठी जबाबदारीही आली आहे. हा पुरस्कार मला नेहमी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने चांगले काम करत राहण्याची, चित्रपटसृष्टीत आपले योगदान देण्याची आणि आपल्या देशाची सेवा करण्याची आठवण करून देत राहील.
मी हा पुरस्कार चित्रपटसृष्टी, माझ्यासोबत काम करणारे सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि माझ्या कुटुंबाला समर्पित करतो, जे नेहमी माझी ताकद बनून माझ्या पाठीशी उभे राहिले. जय हिंद, ” असे म्हणत त्याने आपली भावना व्यक्त केली.
दरम्यान, आर. माधवनसह मल्याळम इंडस्ट्रीचा सुपरस्टार मामूटीलाही राष्ट्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तब्बल 5 दशकांहून टॉलिवूडवर राज्य करणारे मामूटी यांनी अनेक भाषांमध्ये 400 हून अधिक सिनेमांमध्ये काम केल आहे.
तर भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल दिवंगत अभिनेते सतीश शाह यांना मरणोत्तर ‘पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या वतीनं त्यांचे बंधू अरविंद शाह यांनी हा सन्मान स्वीकारला.
हेही वाचा :
Trisha Krishnan: ‘तुझ्यामुळे सगळं खास वाटतं’… तृषाच्या पोस्टनंतर विजयसोबतच्या नात्याची पुन्हा चर्चा





