CSK vs KKR : आऊट की नॉट आऊट…धोनीच्या रिव्ह्यूवर पंचांकडून चूक? पेटला नवा वाद

CSK vs KKR MS Dhoni LBW against Sunil Narine wasted review : आयपीएल २०२५ मधील २५ वा सामन यजमान सीएसके आणि केकेआर यांच्यात पार पडला. या सामन्यात केकेआरने सुनील नरेनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सीएसकेचा ८ विकेट्सनी पराभव केला. सीएसकेचा कर्णधार म्हणून धोनीचे पुनरागमन चांगले झाले नाही. तो फक्त ४ चेंडूत १ धाव घेत बाद झाला. धोनीने चेपॉकमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना बराच वेळ वाट पाहायला लावली. तो स्पर्धेत दुसऱ्यांदा ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र, सुनील नरेनने त्याला बाद केले. यानंतर धोनीच्या विकेटवरुन बराच गदारोळ पाहायला मिळाल, नक्की काय झाले? जाणून घेऊया.
सुनील नरेनने धोनीला दिला चकवा –
सुनील नरेनने वेगवान ऑफ-स्पिन चेंडू टाकला, जो धोनीला समजला नाही आणि तो एलबीडब्ल्यू बाद झाला. पंच ख्रिस गॅफनी यांना आऊट देण्याबाबत कोणतीही शंका नव्हती. धोनीने लगेच रिव्ह्यू घेतला. त्याने नरेनने अपील करताच पंचांना डीआरएससाठी त्याची बॅट दाखवली. जेव्हा रिप्ले पाहण्यात आला तेव्हा अल्ट्राएजवर थोडासा आवाज आला. चेंडू बॅटच्या अगदी जवळ होता. पण तिसऱ्या पंचांनी वेळ घेतला आणि चेंडू आणि बॅटमध्ये अंतर असल्याचे ठरवले.
Ms Dhoni was Clear Not Out
There were spikes when this worst umpiring declared Thala out pic.twitter.com/uncbCppQ69
— •• (@OkayAchaa) April 11, 2025
धोनी आऊट की नॉट आऊट?
MS Dhoni 1(4)
Out or not out? pic.twitter.com/EdyIGHySsl— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) April 11, 2025
तिसऱ्या पंचांनी कबूल केले की चेंडू बॅटला लागला नव्हता. त्यामुळे धोनीला बाद घोषित करण्यात आले. यानंतर धोनी निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. जेव्हा गॅफनीला त्याच्या निर्णयावर ठाम राहण्यास सांगितले गेले तेव्हा चेपॉकमध्ये शांतता होती. मात्र, सोशल मीडियावर सीएसकेचे चाहते म्हणत आहेत की धोनी बाद नव्हता आणि पंचांनी त्याला बाद घोषित करून मोठी चूक केली. लोकांचा असा विश्वास आहे की धोनीची बॅट चेंडूला लागली होती, जी पंचांना समजू शकली नाही.
हेही वाचा – CSK vs KKR : सुनील नरेनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर KKR चा मोठा विजय, CSK चा सलग पाचवा पराभव
अजिंक्य रहाणेचा निर्णय ठरला अचूक –
धोनीच्या विकेट्सचे श्रेय सुनीलसह केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला द्यावे लागेल. कारण त्याने चलाखी दाखवत चेंडू नरेनकडे सोपवला होता. धोनीविरुद्ध नरेनचा रेकॉर्ड चांगला आहे. नरेनने टी-२० मध्ये धोनीला तीन वेळा बाद केले आहे. आयपीएलमध्ये त्याने १९ डावात फक्त दोन चौकार मारले आहेत. १६ व्या षटकाच्या सुरुवातीपूर्वी, रहाणे मोईन अली आणि नरेनशी बोलताना दिसला. त्या तिघांनी मिळून ठरवले की नरेनने त्याचा पूर्ण कोटा गोलंदाजी करावी. त्याला धोनीला लवकर बाद करायचे होते. त्याची रणनीती यशस्वी झाली.





