IPL 2025 : गावस्कर-चंपक जोडीने गाजवलं मैदान, VIDEO होतोय व्हायरल

Sunil Gavaskar Dances with Robot Dog Champak at IPL 2025 Match : आयपीएल २०२५ चा ४२ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने राजस्थानचा ११ धावांनी पराभव केला. दरम्यान या सामन्याच्या नाणेफेकीवेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर ‘रोबोट डॉग’ चंपकसोबत डान्स करताना दिसत आहेत.
सुनील गावस्करांनी रोबोट डॉग’ चंपकसोबत केला डान्स –
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी आयपीएलने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर आयपीएल २०२५ मध्ये ‘रोबोट डॉग’ चंपकसोबत मैदानावर नाचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Looks like Sunny G found a new friend 😊 #TATAIPL | #RCBvRR pic.twitter.com/VPX7CU2ZMb
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2025
आरसीबीचा घरच्या मैदानावर पहिला विजय –
सामन्याबद्दल बोलायचे, तर आरसीबीने अखेर आयपीएल २०२५ मध्ये घरच्या मैदानावर आपला पहिला विजय नोंदवला. या मैदानावर गेल्या सलग ३ सामन्यात पराभव पत्करणाऱ्या रजत पाटीदारच्या संघाने रोमांचक सामन्यात जोरदार पुनरागमन करत राजस्थान रॉयल्सचा ११ धावांनी पराभव केला. या विजयात विराट-पडिक्कलसह जोश हेझलवूडने महत्त्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा – Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने रचला इतिहास! जगातील कोणत्याच खेळाडूला न जमलेला केला पराक्रम
राजस्थानचा सलग पाचवा पराभव –
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने कोहली आणि पडिक्कल यांच्या दमदार अर्धशतकांच्या मदतीने २०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्ससाठी यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल यांच्या दमदार खेळींमुळे विजयाची आशा निर्माण झाली होत. पण जोश हेझलवूड आणि कृणाल पंड्या यांनी त्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीने सामना पलटला. त्यामुळे राजस्थानला १९४ धावांच करता आल्याने आरसीबीने संस्मरणीय विजय मिळवला. त्याचबरोबर राजस्थानला सलग पाचवा पराभव पत्करावा लागला.





