Sunil Gavaskar Statement : “निवृत्ती घेताना शतकं वयापेक्षा…!”; रोहित शर्मा ९२ धावांवर बाद झाल्यानंतर सुनील गावस्करांच मोठं वक्तव्य
Sunil Gavaskar Statement : भारताचे महान माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली असून, रोहितच्या निवृत्तीबाबत आणि त्याच्या फलंदाजीतील बदलांवर थेट भाष्य केले आहे.

Sunil Gavaskar Big Statement On Rohit Sharma Retirement And ODI Centuries : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारतीय संघाने २-१ अशा फरकाने जिंकली. तिसऱ्या सामन्यात भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) ८५ चेंडूंत ९२ धावांची वादळी खेळी केली; मात्र अवघ्या आठ धावांनी त्याचे शतक हुकले. यावर भारताचे महान माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी प्रतिक्रिया दिली असून, रोहितच्या निवृत्तीबाबत आणि त्याच्या फलंदाजीतील बदलांवर थेट भाष्य केले आहे.
“शतक हुकल्याने मी निराश; वयापेक्षा जास्त असावीत शतके!”
हॉटस्टारच्या एका कार्यक्रमात बोलताना गावसकर म्हणाले की, रोहित ९२ धावांवर बाद झाल्याचे पाहून मला खूप वाईट वाटले. पुढे बोलताना ते म्हणाले, “एकदिवसीय विश्वचषक २०२७ नंतर रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो. मात्र, ज्या दिवशी तो निवृत्ती घेईल, त्या दिवशी मला वैयक्तिकरित्या असे वाटते की एकदिवसीय क्रिकेटमधील त्याच्या शतकांची संख्या ही त्याच्या वयापेक्षा जास्त असली पाहिजे.”
२०२३ च्या तुलनेत फलंदाजीत सकारात्मक बदल; टिकून राहण्याला महत्त्व!
👑💯 GAVASKAR HAS SET THE BAR FOR ROHIT! 🇮🇳🔥
Sunil Gavaskar wants to see Rohit Sharma finish with more ODI hundreds than his age when he decides to call time on his career. 🏏❤️
The Hitman has another milestone to chase. 👀🔥#RohitSharma #Hitman #SunilGavaskar #TeamIndia pic.twitter.com/wLB8U7lxIT
— SportsTiger (@The_SportsTiger) October 4, 2026
रोहित शर्माच्या फलंदाजी तंत्रातील बदलांचे गावस्करांनी विशेष कौतुक केले. २०२३ च्या विश्वचषकात रोहित पहिल्या चेंडूपासून अतिआक्रमक खेळायचा, ज्यामुळे तो ३०-४० धावा करून बाद होण्याची भीती असायची. मात्र आता रोहितला क्रीजवर टिकून राहण्याचे महत्त्व समजले असून, तो केवळ जलद धावा काढणारा नसून मोठी शतके ठोकणारा फलंदाज असल्याचे गावसकरांनी नमूद केले.
७०-८० चेंडूंत शतकाची क्षमता; संघासाठी उत्तम स्ट्राईक रेट!
गावस्करांच्या मते, रोहितने दुसऱ्या सामन्यात शतक पूर्ण केले होते आणि तिसऱ्या सामन्यातही त्याने शानदार लय दाखवली. रोहितने खेळपट्टीवर वेळ घालवला की तो ७० ते ८० चेंडूंत आपले शतक सहज गाठू शकतो. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये हा स्कोअरिंग रेट संघासाठी अत्यंत मोलाचा ठरतो आणि संथ फलंदाजीवरून होणाऱ्या टीकेलाही पूर्णविराम मिळतो.





