Indian football : छेत्री बनला सर्वाधिक गोल करणारा पाचवा खेळाडू
Updated On:

कोलकाता – भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. सुनील छेत्रीने मंगळवारी आशिया करंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेत हॉंगकॉंग विरुद्धच्या सामन्यात 84 व्या मिनिटाला गोल केला व आपला 84 वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला.
या कामगिरीसह छेत्रीने रेयाल माद्रीदचे महान खेळाडू फेरेंक यांच्या कामगिरीशी बरोबरी केली. छेत्रीने गेल्या वर्षी ब्राझीलचे महान खेळाडू पेले यांच्या 77 गोलचा विक्रम मोडला होता. सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो व लिओनेल मेस्सी यांच्यानंतर सर्वाधिक गोल करणारा छेत्री तिसराच खेळाडू ठरला आहे. रोनाल्डोच्या नावावर 117, तर, मेस्सीच्या नावावर 86 गोल आहेत.





