Sunetra Pawar – अजितदादा म्हणजे फक्त एक नेता नव्हता. तो बारामतीच्या विकासाचा धडधडता नेता होता. कोणाचंही काम घेऊन दादांकडे गेलं की “होईल” हा शब्द पुरेसा असायचा, कारण त्या शब्दामागे कृतीची खात्री असायची. विकासकामातील बारकावे, अधिकाऱ्यांवरचा आदरयुक्त वचक, लोकांमध्ये मिसळून घेतलेला संवाद दादांची शैलीच वेगळी, दमदार होती. दादांची उंची गाठणं सोपं नाही, हे सर्वांना ठाऊक आहे. पण आज त्या उंचीसमोर ठामपणे उभं राहण्याचं धैर्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात आहे, असे मत नगरसेवक अमोल कावळे यांनी व्यक्त केले आहे. अजितदादांच्या पाठीशी उभे राहून सुनेत्रा पवार यांनी अनेक वर्षे दुसरी बाजू तितक्याच ताकदीने सांभाळली आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, समाजकारण आणि राजकारण प्रत्येक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग होता. अनेक कुटुंबांची कामे त्यांच्या माध्यमातून मार्गी लागली. अनुभव, लोकांशी असलेली नाळ आणि कामाची समज हे त्यांचं भक्कम भांडवल आहे. यावेळी बारामतीचे सहकार क्षेत्र म्हणजे हजारो कुटुंबांचा आधार आहे. शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिकांचे अर्थकारण त्यावर उभे आहे. अजितदादांनी जशी मजबूत पकड ठेवली होती, तशीच दिशा कायम ठेवण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्टपणे दाखवून दिला. विश्वास तुटू देणार नाही सहकाराचा गाडा रुळावरून घसरणार नाही. विश्वास तुटू देणार नाही. बारामतीचे अर्थकारण अधिक भक्कम करणार हा संदेश त्या बैठकीतून स्पष्ट गेला. जनता दरबारही खूप काही सांगून गेला आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना समोर बसवून नागरिकांची निवेदने प्रत्यक्ष स्वीकारली. जी कामे जागेवर निकाली निघू शकत होती, ती तात्काळ सोडवली. जी प्रशासन पातळीवर निर्णय घेण्यासारखी होती, त्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट, सूचना दिल्या. दादांचे स्वप्न अर्धवट राहू देणार नाही यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यां अजितदादांचे स्वप्न अर्धवट राहू देणार नाहीत. सहकार, उद्योग, शिक्षण, आरोग्य प्रत्येक क्षेत्रात विकासाची गती तशीच राहील. किंबहुना अधिक वेगाने पुढे जाईल. बारामतीकरांच्या मनात आज नेतृत्व बदललं असेल, पण विश्वास तसाच आहे. हा विश्वास पुढे नेण्याची ताकद सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे ही भावना निर्माण झाली असल्याचे कवळे यांनी सांगितले.