Sunetra Pawar। निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेदरम्यान सुनेत्रा पवार म्हणाल्या…

Sunetra Pawar । राज्यसभेच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर आता लोकसभेसाठी तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवार यांच्याकडून कोणता उमेदवार दिला जाणार याची चर्चा रंगली होती. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात उतरतील अशा चर्चा होत्या. आता बारामतीत लोकसभेला सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांची माहिती आणि कामाचा आढावा सांगणारा प्रचार रथ फिरू लागला असल्याचेही दिसून आले आहे.
अशात सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात सूचक विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्या म्हणाल्या,’तुम्ही माझ्यावर नेहमीच खूप प्रेम करता. हे प्रेम असेच उदंड राहणार आहे, याची मला खात्री आहे. हे प्रेम शेवटपर्यंत असंच राहू द्या. तुमचे हे प्रेमच माझी उर्जा असणार आहे. तुमचे पाठबळ हीच माझी शक्ती आहे. अजित पवार यांच्यावर तर तुम्ही अनेक वर्षांपासून प्रेम करता. ते तर तुमचेच आहेत. मी तुमची सून असूनही मला तुम्ही जीव लावला. याला उतराई होण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करू. बारामतीकर, काटेवाडीकर येथील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी अजित पवार सतत प्रयत्न करत असतात. इथून पुढेदेखील त्यांचा हाच प्रयत्न राहील,” अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या या भाषणानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वृतळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणूक वाढविण्यावर प्रतिक्रिया दिली होती ते म्हणाले होते, ‘आम्ही त्यावर विचार करू.. जेव्हा वेळ जेईल तेव्हा त्या त्या गोष्टीचा विचार केला जाईल’ असं देखील त्यांना यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा
shahrukh khan dhoom 4 | ‘धूम 4’ चित्रपटात रोमान्सचा बादशाह शाहरुख खान दिसणार अॅक्शन मोडमध्ये ?





