Sunetra Pawar : उपमुख्यमंत्रीपदानंतर आता सुनेत्रा पवार सांभाळणार ‘ही’ मोठी जबाबदारी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य हादरले होते. २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीकडे विमानाने प्रवास करताना झालेल्या भीषण विमान अपघातात त्यांचे निधन झाले.

Sunetra Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य हादरले होते. २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीकडे विमानाने प्रवास करताना झालेल्या भीषण विमान अपघातात त्यांचे निधन झाले.
या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर चार जणांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय आणि प्रशासकीय स्थैर्य राखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलली.
त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता त्यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पालकमंत्री पदाचा सस्पेन्स संपला
अजित पवार हे पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्री होते. पुण्याच्या विकासात त्यांचा मोठा वाटा होता, तर बीड जिल्ह्यातील राजकारण आणि प्रशासनातही त्यांचा प्रभाव प्रस्थापित होता. त्यांच्या निधनानंतर या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात होते.
अखेर राज्य सरकारने अधिकृत शासन निर्णय जारी करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आता पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा परिपत्रक जारी करण्यात आला असून, यामुळे अजित पवार यांच्या वारशाला पुढे नेण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे.
आव्हाने आणि मोठी जबाबदारी
सुनेत्रा पवार यांच्यासमोर आता अजित पवार यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देण्याचे मोठे आव्हान आहे. पुणे जिल्ह्याचा वेगवान विस्तार, पायाभूत सुविधा, शहरी विकास आणि बीडमधील प्रलंबित प्रश्न, शेती-संबंधित मुद्दे, पाणीटंचाई आदी समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांना प्रशासकीय कौशल्य आणि राजकीय दूरदृष्टी वापरावी लागणार आहे.
एकाच वेळी उपमुख्यमंत्रीपदासह दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी मिळाल्याने सुनेत्रा पवार यांच्या राजकीय कारकीर्दीतील हा एक निर्णायक आणि ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाने महायुती सरकारमध्ये स्थैर्य आणि सातत्य राखण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.
हे पण वाचा : Narendra Modi : निवडणुकांतील सातत्यपूर्ण विजयामुळे एनडीएने आत्मसंतुष्ट होऊ नका; पंतप्रधान मोदींनी दिला सल्ला






