Sultan of Johor Cup 2024 : भारताचा विजयी धडाका कायम, जपाननंतर ग्रेट ब्रिटनलाही चारली पराभवाची धूळ…

Sultan of Johor Cup 2024 (Johor Bahru, Malaysia) : दिलराज सिंग आणि शारदा नंद तिवारी यांच्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाने रविवारी येथे ग्रेट ब्रिटनचा 6-4 असा पराभव करत सुलतान ऑफ जोहोर चषक हॉकी स्पर्धेत विजयी मोहीम सुरू ठेवली.
भारताकडून मोहम्मद कॉनन दादने (सातव्या मिनिटाला) भारताचे खाते उघडले. यानंतर दिलराजनं (17वे, 50वे मिनिट), शारदा नंद (20वे, 50वे मिनिट) यांनी गोल केले. याशिवाय भारताकडून मनमीत सिंगने (26व्या मिनिटाला) गोल केला. तर दुसरीकडे ब्रिटनकडून रॉरी पेनरोज (दुसरे, 15वे मिनिट) आणि मायकेल रॉयडेन (46वे, 59वे मिनिट) यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
Another day, another win!💪🏻
Our Jr. Men’s team continues to flourish at the Sultan of Johor Cup.
Team India scores a smashing victory over Great Britain in a Goal-fest!
A 6-4 win is a statement, off to the next one.🥳
Next Up Malaysia 🇲🇾#IndiaKaGame #HockeyIndia… pic.twitter.com/xeQwWUf9ej— Hockey India (@TheHockeyIndia) October 20, 2024
याआधी, भारताने शनिवारी जपानला हरवून आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली होती. त्यानी आपली तीच लय कायम ठेवली आणि स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. भारतीय संघ दोन सामन्यांत दोन विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
भारतीय संघाचा पुढील सामना मंगळवारी (22 आॅक्टोबर) संध्याकाळी 6.05 वाजता यजमान मलेशियाशी होणार आहे. यासामन्यानंतर भारतीय संघ 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.45 वाजता ऑस्ट्रेलिया तर 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.35 वाजता न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे.



