FIH Hockey Pro League 2023/24 : टीम इंडियाची हराकिरी! सलग आठवा पराभव, ग्रेट ब्रिटन 3-2 ने विजयी…

FIH Women’s Hockey Pro League 2023/24 : भारतीय महिला हॉकी संघाचा रविवारी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन (FIH) प्रो लीगमध्ये ग्रेट ब्रिटनकडून 2-3 असा पराभव झाला. भारतीय संघाचा हा सलग आठवा पराभव आहे. भारतीय संघाने बहुतांश सामन्यात चांगली कामगिरी केली पण तरीही संघाला अखेर पराभवाला सामोरे जावे लागले. यासह भारतीय महिलांनी हंगामाचा शेवट आणखी एका पराभवाने केला.
भारतीय संघासाठी लालरेमसियामी (14व्या मिनिटाला) आणि नवनीत कौर (23व्या मिनिटाला) यांनी गोल केले. त्याचवेळी ग्रेट ब्रिटनसाठी वॉटसन शार्लोट (3रे मिनिट) आणि बाल्डसन ग्रेस (56वे मिनिट, 58वे मिनिट) यांनी गोल केले. या सामन्यातील पराभवानंतर, भारतीय महिला संघ एफआयएच प्रो लीग 2023-24 क्रमवारीत 16 सामन्यांतून 8 गुणांसह 8व्या स्थानावर आहे.
So close, yet so far. Proud of our team’s fighting spirit. 💪🏻
GBR 🇬🇧 3 – 2 IND 🇮🇳
3’ Watson Charlotte
56′ 58′ Balsdon Grace (PC)14’ Lalremsiami
23’ Kaur Navneet#HockeyIndia #IndiaKaGame #FIHProLeague #IndiaWomensTeam
.
.
.
.@CMO_Odisha @sports_odisha @FIH_Hockey… pic.twitter.com/FOR5WUbdcg— Hockey India (@TheHockeyIndia) June 9, 2024
तिसऱ्याच मिनिटाला वॉटसनने गोल करत ब्रिटनला आघाडी मिळवून दिली होती पण लालरेमसियामीने 14व्या मिनिटाला गोल करून स्कोअर 1-1 असा बरोबरीत आणला. त्यानंतर 23व्या मिनिटाला नवनीत कौरने भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र, यजमान संघाच्या ग्रेस बाल्डसनने 56व्या आणि 58व्या मिनिटाला दोन गोल करत भारताच्या हातून विजय हिसकावून घेतला. व्हिडिओ रिव्ह्यूसह दोन निर्णयांमुळे प्रशिक्षक हरेंद्र सिंग खूपच निराश झाले होते. एकवेळ स्कोअर 2-2 असा बरोबरीत होता आणि अंतिम हूटर वाजणारच होता की, ग्रेसने जोरदार फटका मारत गोल केला.
T20 World Cup 2024 : बुमराह ठरला गेमचेंजर..! थरारक सामन्यात टीम इंडियाचा पाकवर 6 धावांनी विजय…
ग्रेसच्या सामन्यातील निर्णायक गोलने प्रशिक्षक हरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची पहिल्या विजयाची प्रतीक्षा वाढवली आहे. ही तीच ग्रेस बाल्डसन आहे जिने तीन वर्षांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताविरुद्ध विजयी गोल करून आपल्या संघाला कांस्यपदक मिळवून दिले होते.




