Sultan of Johor Cup 2024 : ऑस्ट्रेलियानं रोखली टीम इंडियाची विजयी घोडदौड …

Sultan of Johor Cup 2024 (Johor Bahru, Malaysia) : डीकिन स्टेन्गरने केलेल्या धमाकेदार हॅट्ट्रिकच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतावर 4-0 अशी एकतर्फी मात करताना सुलतान ऑफ जोहर हॉकी मालिकेत भारताची विजयी घोडदौड रोखली.
A tough loss to take after 3️⃣ amazing wins but we intend to bounce back even stronger 💪🏻
Next up New Zealand🇳🇿Australia🇦🇺 4-0🇮🇳 India#IndiaKaGame #HockeyIndia #SultanOfJoharCup #JrMensTeam
.
.
.@CMO_Odisha @IndiaSports @Media_SAI@sports_odisha pic.twitter.com/Masl59nrG6— Hockey India (@TheHockeyIndia) October 23, 2024
ऑस्ट्रेलियाच्या अँड्र्यूने लढतीच्या 29व्या मिनिटाला रिव्हर्स हिटवर भारताचा बचाव भेदण्यात यश मिळविले व लढतीत 1-0 अशी आघाडी मिळविली. मध्यंतराला ऑस्ट्रेलिया 1-0 असा आघाडीवर होता. मध्यंतरानंतर तिसऱ्याच मिनिटाला डीकिन स्टेन्गरने गोल केला. या गोलमधून भारतीय संघ सावरण्याच्या आत त्याने पुन्हा भारताचा बचाव भेदण्यात यश मिळविले.
Sultan of Johor Cup 2024 : भारताचा विजयी धडाका कायम, जपाननंतर ग्रेट ब्रिटनलाही चारली पराभवाची धूळ…
सलग दोन गोलमुळे ऑस्ट्रेलियाकडे 3-0 अशी आघाडी झाली. भारताने काही संधी निर्माण केल्या मात्र, त्याचे रूपांतर गोलमध्ये करण्यात त्यांना अपयश आले. डीकिन स्टेन्गरने 53 व्या मिनिटाला अजून एका गोल करताना आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. या पराभवानंतर देखील भारत 9 गुणांसह अव्वल स्थानी तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी आहे.





