Sultan of Johor Cup 2024 : भारताच्या मोहिमेस जपानविरूध्दच्या लढतीनं प्रारंभ, प्रशिक्षक श्रीजेशवर मोठी जबाबदारी…

Sultan of Johor Cup 2024 :- दोन वेळेसचा ऑलिम्पिक पदक विजेता पीआर श्रीजेशकडे भारताच्या कनिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद देण्यात आले होते. प्रशिक्षक झाल्यानंतर श्रीजेश प्रथमच प्रशिक्षक म्हणून स्पर्धेला सामोरे जाणार असून यावेळी 21 वर्षांखालील संघ 12 व्या सुलतान जोहर हॉकी स्पर्धेचे चौथ्यांदा विजेतेपद मिळविण्यासाठी उतरणार आहे. या स्पर्धेतील भारताच्या मोहिमेची सुरुवात शनिवारी(19 आॅक्टोबर) जापान विरुद्धच्या सामान्यपणे होणार आहे.
🏑 The 12th Sultan of Johor Cup Junior Men’s Invitational kicks off on 19th October! 🌍🔥
Prepare for non-stop action as the world’s top young talent battles it out on the field. Don’t miss a moment as Team India faces off in their first fixture, aiming for victory! 🇮🇳💪… pic.twitter.com/g5aDHOlV45
— Hockey India (@TheHockeyIndia) October 18, 2024
ऑलिम्पिक स्पर्धेनंतर श्रीजेशने निवृत्ती स्वीकारून कनिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले. भारताने गेल्या वर्षी कनिष्ठ गटाने आशिया स्पर्धेत जापानवर 3-1 असा विजय मिळविला होता. यावेळी श्रीजेशकडे प्रशिक्षकपदाची जाबाबदारी सोपविण्यात आली असल्याने, यावेळी चौथे विजेतेपद भारताला मिळेल अशी आशा असल्याचे भारताचा कर्णधार अमीर अलीने बोलताना सांगितले. आम्ही श्रीजेश यांच्या मार्गदर्शनाखाली चांगला सराव करत असून त्यांच्यासोबत आमची पहिलीच स्पर्धा खेळण्यासाठी उत्सूक असल्याचे अली म्हणाला.
WR Chess Masters Title 2024 : भारताच्या अर्जुन एरीगॅसीनं पटकावलं विजेतेपद…
भारताने यापूर्वी 2013, 20214 व 2022 मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. जापाननंतर रविवारी ब्रीटन संघाचे भारतासमोर आव्हान असणार आहे. या स्पर्धेत भारताने 3 वेळेस विजेतेपद तर 4 वेळेस उपविजेतेपद पटकावले आहे. 22 ऑक्टोबर रोजी मलेशिया, 23 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया तर 25 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाच्या लढती असणार आहेत.





