Sultan Chaudhary On India Action। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि लोकांची झोप उडाली आहे. त्यांचे नेते रात्री २.३० वाजता पत्रकार परिषद घेत आहेत. घाबरलेला शेजारी देश वारंवार सांगत आहे की भारत कधीही हल्ला करू शकतो. आता पीओकेचे अध्यक्ष म्हणून ओळखले जाणारे सुलतान चौधरी यांनी संयुक्त राष्ट्र आणि मित्र देशांकडून त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. सुलतान चौधरी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना मध्यस्थीची भूमिका बजावण्याचे आवाहन केले आहे, तसेच वाढत्या तणावाचा इशारा दिला आहे. सुलतान चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय सहभागाची तातडीची गरज यावर भर दिला. त्यांनी जोर देऊन सांगितले की, “बऱ्याच घडामोडी सुरू आहेत आणि काहीही घडू शकते. मला वाटते की संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी काश्मीरवर मध्यस्थीची भूमिका बजावण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण आपल्या काश्मीरमधील लोकांनी इतक्या काळापासून खूप त्रास सहन केला आहे. भारत काहीही करू शकतो.” पाकिस्तानला वाटतीय भीती Sultan Chaudhary On India Action। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. भारताने अद्याप कोणतीही गतिमान कारवाई केलेली नाही, तरीही पाकिस्तान घाबरलेल्या स्थितीत फिरत आहे आणि त्यांच्या नेत्यांमध्ये दहशत पसरली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तर असेही म्हटले की,भारतासोबत संघर्षाची शक्यता वाढत आहे… देव आपल्याला युद्धापासून वाचवो. नुकतीच त्यांनी पत्रकार परिषद घे त्यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान मोदींच्या सलग बैठकांमुळे पाकिस्तान हादरला Sultan Chaudhary On India Action। बुधवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एनएसए अजित डोभाल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर मंत्रिमंडळ सदस्यांसह झालेल्या मॅरेथॉन बैठकींनंतर त्यांचे हे वक्तव्य आले. या बैठकींमध्ये २६ पर्यटकांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांविरुद्ध बदला घेण्याची पूर्ण मोकळीक लष्कराला देण्यात आली.