Sujay S. Dahake’s new film : ‘श्यामची आई’नंतर सुजय एस. डहाकेंचा नवा चित्रपट; पहिली झलक आली समोर, नावही आहे हटके
Sujay S. Dahake's new film : या चित्रपटांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आगामी चित्रपटातील झलक समोर आल्यानंतर ट्रोलिंग आणि शाब्दिक हिंसा यांसारख्या गंभीर विषयांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

Sujay S. Dahake’s new film : मराठी चित्रपटसृष्टीत काही मोजकेच पण दर्जेदार चित्रपट बनवणारा दिग्दर्शक सुजय एस. डहाके आता त्याची आगामी कलाकृती घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून त्याची छोटीसी झलकही समोर आली आहे.
या चित्रपटाचे नाव खूपच हटके असून त्याची छोटी झलक पाहून चित्रपटाला घेऊन विविध चर्चा रंगल्या आहेत. ‘तुझ्या आईला’ असे चित्रपटाचे नाव आहे. या नावामुळे चित्रपटाची कथा वेगळ्या धाटणीची असणार असा अंदाज लावला जात आहे.
सुजयच्या शाळा आणि श्यामची आई या दोन चित्रपटांना मोठे यश मिळाले. या चित्रपटांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आगामी चित्रपटातील झलक समोर आल्यानंतर ट्रोलिंग आणि शाब्दिक हिंसा यांसारख्या गंभीर विषयांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
चित्रपटाची कथा एका जिज्ञासू १२ वर्षांच्या मुलाभोवती फिरते. आपल्या आईलाच वारंवार शाब्दिक हिंसेचे लक्ष्य का केले जाते, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तो एका अनोख्या प्रवासाला निघतो.
View this post on Instagram
खेळकर आणि रंजक शैलीत मांडलेली ही कथा दैनंदिन आयुष्यात शाब्दिक हिंसा कशाप्रकारे सहजपणे स्वीकारली जाऊ लागते, याचा वेध घेते. त्याचबरोबर अशा वातावरणाचा मुलांच्या मनावर आणि त्यांच्या विचारविश्वावर नेमका काय परिणाम होतो, हेही चित्रपटातून अधोरेखित करण्यात आले आहे.
‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते’ अशी चित्रपटाची हटके टॅगलाइन लक्ष वेधून घेते. चित्रपटात अभिनेत्री राजश्री देशपांडे, रोहिणी हट्टंगडी, संभाजी भगत, अभिजित थिटे, सोहम बाबर आणि अभिषेक झेंडे यांच्यासह अनेक गुणी बालकलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
आगळावेगळा विषय, संवेदनशील मांडणी आणि दिग्दर्शक सुजय एस डहाके यांची वैशिष्ट्यपूर्ण कथनशैली यामुळे ‘तुझ्या आयला’ हा चित्रपट इतरांपेक्षा नक्कीच वेगळा ठरण्याची शक्यता आहे. शाब्दिक हिंसेकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता तिच्या परिणामांचा गांभीर्याने विचार करायला लावणारा हा चित्रपट ठरणार आहे. हा चित्रपट २५ सप्टेंबर या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.
Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावर आक्षेप; सुनेत्रा पवारांना पुन्हा बजावली नोटीस





