Rajshri Deshpande : अनेक हिंदी चित्रपटात आणि वेबसिरीजमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री राजश्री देशपांडे आता एका मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. (Rajshri Deshpande) बाप्या असे या मराठी चित्रपटाचे नाव असून, चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. बाप्या या चित्रपटाचा विषय अत्यंत संवदेनशील असून त्याची मांडणी विनोदी पद्धतीने केली असल्याचे ट्रेलर पाहिल्यानंतर लक्षात येते. या चित्रपटाला मागच्या वर्षी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकता आहे. मैत्री, प्रेम आणि नात्यांमधला गोंधळ चित्रपटात बघायला मिळणार आहे. (Rajshri Deshpande) ‘आपली यारी… गावावर भारी!’ अशी लक्ष वेधून घेणारी टॅगलाईन देण्यात आली आहे. (Rajshri Deshpande) अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने या अगोदर सत्यशोधक या मराठी चित्रपटात काम केले आहे. नुकतीच कॅन्सर सारख्या गंभीर आजारातून ती बाहेर पडली असून, पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत सक्रीय झाली आहे. (Rajshri Deshpande) राजश्रीने स्वतः या चित्रपटात ‘बाप्या’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तिचा ‘शैलजा ते शैलेश’ हा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. १५ मे या दिवशी हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. Rajshri Deshpande Rajshri Deshpande : कॅन्सरवर मात! आता ही प्रसिद्ध अभिनेत्री ‘बाप्या’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार राजश्री देशपांडेसह गिरीश कुलकर्णी, देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे समीर तिवारी दिग्दर्शक असून मुत्कल तेलंग आणि समीर तिवारी निर्माते आहेत. अभिनेत्री राजश्री देशपांडे (Rajshri Deshpande) हिला ब्रेस्ट कॅन्सर या स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. याविषयी तिने स्वतः पोस्टद्वारे माहिती दिली होती. तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आणि आता ती या आजारातून बाहेर पडली आहे. हेही वाचा : Top 10 News : सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या जागेवर कोणाला संधी मिळणार?, सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या आणि नॅशनल क्रश गिरिजा ओकने लूक बदलला, वाचा टॉप १० बातम्या