Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावर आक्षेप; सुनेत्रा पवारांना पुन्हा बजावली नोटीस
Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षाच्या निवडीला आव्हान

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आले आहेत. सुनेत्रा अजित पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडीला आव्हान देणारी नोटीस राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी पुन्हा बजावली आहे.
२६ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या निवडीला या नोटिशीमध्ये आव्हान देण्यात आले आहे. यापूर्वी ९ जुलै रोजी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बृजमोहन श्रीवास्तव यांना पहिली कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र या नोटीसला संबंधितांनी उत्तर दिलेले नसल्याने याची आठवण करून देण्यासाठी ही नोटीस बजावत असल्याचे यात म्हटले आहे. ही निवड रद्द करून संघटनात्मक निवडणूक घेण्याची मागणीही यात करण्यात आली आहे.
२६ फेब्रुवारी २०२६ रोजी पक्षाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला आहे. ही निवडणूक घटनाबाह्य आहे. या प्रक्रियेसाठी निवडणूक प्राधिकरण नव्हते. तसेच निवडणूक लढवणे किंवा मतदान करण्याची संधी देण्यात आली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, १५ दिवसांच्या मुदतीत मागण्या पूर्ण न केल्यास पक्षाची निवडणूक रद्द करण्यासाठी योग्य नियामक मंचांकडे आम्ही जाण्यास मुक्त आहोत, असे असे नोटीसीमध्ये म्हटले आहे. यावर आता काय उत्तर दिले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सच्चिदानंद सिंह कोण आहेत?
पक्षाचे झारखंड प्रदेशाध्यक्ष राहिलेले सच्चिदानंद सिंह कोण हे राष्ट्रवादीशी १५ वर्षांपासून संबंधित आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये कर्जत येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते महाराष्ट्राच्या फारसे सक्रिय नसले तरी पक्षाच्या दिल्लीतील आणि इतर राज्यांमधील राजकारणात ते भूमिका बजावत असतात.
हेही वाचा:
Gold Silver Rate: सोने ४३०० रुपयांनी अन् चांदी १०००० रुपयांनी महाग ; खरेदीपूर्वी आजची किंमत वाचाच






