एअर इंडियाच्या महिला पायलटची आत्महत्या; २५ व्या वर्षी उचलले टोकाचे पाउल

Suicide | Air India – एअर इंडियाची 25 वर्षीय महिला पायलट मुंबईतील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी सांगितले की, तिच्या प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तिचा प्रियकर आदित्य पंडित याने हत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाची पायलट सृष्टी तुली हीचा मृतदेह तिच्या अंधेरी येथील फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पवई पोलिसांनी तिचा २७ वर्षीय प्रियकर आदित्य पंडित याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
पंडित तिच्याशी गैरवर्तन करायचा आणि फोनवरून अनेकदा वाद घालायचा, त्यामुळे सृष्टीने हे पाऊल उचलल्याचा आरोप सृष्टीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
सध्या पोलिसांनी सृष्टीच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही तक्रार मुलीच्या काकांनी पोलिसात दिली असून, पुढील तपास पोलिस अधिकारी करत आहेत.





