पिंपरी | नूतन महाराष्ट्र शिक्षक, सेवकांच्या पतसंस्थेची कार्यकारिणी जाहीर

पवनानगर, (वार्ताहर) – नूतन महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नवीन समर्थ विद्यालयाचे अध्यापक समीर गाडे, उपाध्यपदी गणेश साबळे तर खजिनदारपदी वंदना मराठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नूतन माध्यमिक शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच वडगाव येथील सहाय्यक निंबधक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जरे यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी अध्यक्षपदासाठी गाडे, उपाध्यक्ष पदासाठी साबळे व खजिनदार पदा साठी मराठे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.
यावेळी पतसंस्थेचे कार्यकारी संचालक भाऊसाहेब आगळमे, संचालक सोमनाथ साळुंके, विनोद भोसले , अलका आडकर, भारत काळे, दुर्गा भेगडे, संगिता खराडे, संजय हुलावळे, दत्तात्रय ठाकर, उमेश इंगुळकर, पल्लवी दुश्मन,
संतोष घरदाळे, संजय कसाबी, रोहित ढोरे व्यवस्थापक सपना खोत उपस्थित होते. यावेळी बोलताना गाडे म्हणाले की, पतसंस्थेचा सभासद डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील तसेच पतसंस्थेचे सुरु असलेला प्रगतीचा चढता आलेख कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील.





