Fungal Infection : ऐन उन्हाळ्यात ‘फंगल इन्फेक्शन’चा त्रास होतोय? कशी घ्या स्वतःची काळजी

Summer Care Tips : उन्हाळ्याचे आगमन होताच अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागतात. त्यामुळे स्वतःची काळजी घेणे फार महत्वाचे असते. उन्हाळ्यात अनेक आजार उद्भवतात यातील काही सामान्य समस्या म्हणजे सनबर्न, त्वचेवर पुरळ आणि फंगल इन्फेक्शन या आहेत.
परंतु याव्यतिरिक्त काही गंभीर समस्या या मोसमात उद्भवू शकतात. उन्हाळ्यात उष्णता आणि दमटपणामुळे काही आजारांचा धोका वाढतो. यापैकीच एक म्हणजे ‘फंगल इन्फेक्शन’. शरीराच्या कोणत्याही भागात होणारे हे फंगल इन्फेक्शन एका काळानंतर पुरते हैराण करून सोडते. मात्र ते का होते? काय काळजी घेऊ शकतो? याबद्दल आपण पाहुयात….
‘फंगल इन्फेक्शन’चे कारणे काय?
– उष्ण आणि दमट वातावरणामुळे ही समस्या होते.
– ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांना फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
– घट्ट शूज किंवा कपडे घालणे.
– खुप वेळ मोजे घालणे.
– वैयक्तिक स्वच्छतेची काळजी न घेणे.
– प्रतिजैविक औषधांचे दुष्परिणाम
– रोगप्रतिकार शक्ती
काय काळजी घ्यावी?
– वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या.
– स्नानगृह किंवा सार्वजनिक आंघोळीच्या ठिकाणी स्वच्छता बाळगा.
– सतत एकच मोजे घालू नका.
– खूप घट्ट शूज घालू नका.
– कोणाचीही वस्तू वापरू नका.
– 2.5 PH चे ॲसिडीक पाणी दिवसातुन 3-4 वेळा बाधित जागेवर स्प्रे करावे.
– कँडीडा अल्बिकन्स : हे एक फंगल इन्फेक्शन असून ते त्वचेवर, तोंडाजवळ गुप्तांगाजवळच्या ओलसर त्वचेवर होते.
-रिंगवर्म : हे सुद्धा एक फंगल इन्फेक्शन आहे. जे प्रामुख्याने त्वचेवर, डोक्याच्या त्वचेवर, पायांना, मांडीवर आणि गुप्तांगाजवळ होते.





