Sudhir Mungantiwar : चंद्रपूर येथील सभेत बोलताना भाजपचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्याची क्लिप काॅंग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक्सवर पोस्ट करत निवडणुक आयोगाला टॅग केली. सुधीर मुनगंटीवार यांनी आचार संहितेचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. त्या पोस्टची निवडणुक आयोगाने दखल घेतली आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आता कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सचिन सावंत यांनी काय पोस्ट केली –
“निवडणूक आयोगाने तात्काळ सुधीर मुनगंटीवार यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. अशा तऱ्हेची विखारी भाषा खपवून घेतली जाऊ नये. “एका भावाला बहिणीबरोबर ” सारखे भयंकर व बेफाम आरोप मुनगंटीवार यांनी केले. हरण्याच्या भीतीने तोल ढळला आहे. नुकतेच “आप”च्या मंत्री आतिशी यांनी भाजपाने त्यांना पक्षात प्रवेश करावा अशी ऑफर दिली असा आरोप केला, तेव्हा निवडणूक आयोगाने आतिशींना नोटीस पाठवली. जगनमोहन रेड्डी यांना तसेच सुप्रिया श्रीनेट यांना नोटीस पाठवली. @ECISVEEP ने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन सहन केले जाणार नाही असे म्हटले आहे. @CEO_Maharashtra या विधानांवर निवडणूक आयोगाच्या मतानुसार कारवाई करतील ही अपेक्षा. मुनगंटीवार यांच्या या भाषेला आणि खोट्या आरोपांना त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. आम्हाला केवळ सत्य सांगावे लागेल.”, अशी पोस्ट काॅंग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाने तात्काळ सुधीर मुनगंटीवार यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. अशा तऱ्हेची विखारी भाषा खपवून घेतली जाऊ नये. “एका भावाला बहिणीबरोबर ” सारखे भयंकर व बेफाम आरोप मुनगंटीवार यांनी केले. हरण्याच्या भीतीने तोल ढळला आहे.
नुकतेच “आप”च्या मंत्री आतिशी यांनी… pic.twitter.com/orr8dw6yYl— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 8, 2024
निवडणुक आयोगाने काय म्हंटले –
सचिन सावंत यांनी केलेल्या ट्विटची दखल निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. निवडणूक काळातील कोणत्याही गैरप्रकाराबद्दल आपण cVigil या अॅपवर तक्रार दाखल करू शकता. प्रत्येक तक्रारीवर १०० मिनीटांमध्ये पहिली कार्यवाही.” निवडणुक आयोगाने दखल घेतल्यामुळे मुनगंटीवार यांच्यावर काय कारवाई होणार हे पहावे लागणार आहे.
आरोपानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी काय पोस्ट केली –
“१९८४ साली काँग्रेस ने केलेल्या अत्याचारांची आठवण करुन दिली तर इतक्या मिरच्या झोंबल्या. अर्धवट क्लिप वायरल करुन काँग्रेस ने जनतेवर केलेले अन्याय तुम्ही लपवू शकणार नाही. १९८४ च्या दंगलीत असे अत्याचार झालेच नाहीत असं छाती ठोक पणे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावं. काँग्रेसच्या हुकूमशाही राजवटीवर मी नेहमी बोलत राहीन आणि तुमच्या अशा खोडसाळपणामुळे मी बिलकुल घाबरणार नाही. वंदे मातरम!!!” अशी पोस्ट सुधीर मुनगंटीवार यांनी एक्सवर केली आहे.
१९८४ साली काँग्रेस ने केलेल्या अत्याचारांची आठवण करुन दिली तर इतक्या मिरच्या झोंबल्या. अर्धवट क्लिप वायरल करुन काँग्रेस ने जनतेवर केलेले अन्याय तुम्ही लपवू शकणार नाही. १९८४ च्या दंगलीत असे अत्याचार झालेच नाहीत असं छाती ठोक पणे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावं. काँग्रेसच्या… pic.twitter.com/05Z5ecyaEY
— Sudhir Mungantiwar (Modi Ka Parivar) (@SMungantiwar) April 8, 2024
चंद्रपूर लोकसभेसाठी 19 एप्रिलला मतदान –
चंद्रपूर लोकसभेसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. येथे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. चंद्रपूरमधून भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रतिभा धानोरकर या बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. बाळू धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार होते. पण, त्यांचं अकाली निधन झालं होतं. त्यानंतर ही जागा काँग्रेसने त्यांच्याच पत्नीसाठी ही जागा दिली आहे. 2019 ला मोदी लाट असतानाही भाजपच्या ताब्यातून खेचून आणलेला एकमेव मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर. हा मतदारसंघ उमेदवारीपासून तर निवडणुकीच्या निकालापर्यंत चांगलाच चर्चेत राहिला होता. यावेळीही येथे अटीतटीची लढत होणार आहे. त्यामुळे पीएम नरेंद्र मोदी यांनी येथे पहिली सभा घेतली.