पुणे जिल्हा | संस्कार शाळेचे खो खो स्पर्धेत यश

पिरंगुट, (वार्तांहर) – येथील संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत यश संपादन केले. भरे संकुल या ठिकाणी तालुकास्तरीय १४ व १७ वयोगटातील मुले व मुली यांच्या खो-खोच्या स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेमध्ये शाळेच्या १४ वयोगट मुले व १७ वयोगट मुली यांनी प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली.
विद्यार्थ्यांनी आपला उत्कृष्ट खेळ खेळून हा विजय मिळवला आहे. व या विजयासाठी शाळेचे प्रशांत देशमुख व क्रीडा शिक्षक प्रतीक्षा सुतार यांचा सिंहाचा वाटा आहे.
मुलांनी जर अशीच प्रामाणिक मेहनत केली तर नक्कीच यश मिळवता येते. यश अपयशाचा विचार न करता शंभर टक्के प्रयत्न केले व मेहनत घेतली तरी यश हे मिळतेच असे शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा साठे यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष शिवाजी साठे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील शिक्षकांनीही विजयी संघाचे ढोल, ताशा, लेझीमच्या दणदणीत आवाजात जल्लोषात, उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सर्वच विद्यार्थ्यांचे पालकांकडून ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.





