पुणे जिल्हा | भैरवनाथ विद्यालाचे दोन्ही संघ जिल्हास्तरावर

जवळार्जुन, (वार्ताहर) – पुरंदर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा जवळार्जुन येथील इंग्लिश स्कूलच्या मैदानावर उत्साहात पार पडल्या. यात 14, 17, 19 वयोगटातील मुला-मुलींचे संघ सहभागी झाले होते.
यात 14 वर्षे वयोगटात वनपुरीतील भैरवनाथ विद्यालयाच्या मुले-मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवल्याने दोन्ही संघांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन अण्णासाहेब राणे, सरपंच सोमनाथ कणसे, पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय रोकडे, सचिव सचिन धनवट, प्रल्हाद कारकर, कार्याध्यक्ष रणजित खारतोडे,
पोलीस पाटील अविनाश राणे, श्रीकांत राणे, नवनाथ राणे, श्रीकांत राणे, जनार्धन टेकवडे, सतीश साळुंके, बाबूराव गायकवाड, ज्ञानदेव खेडेकर, सोमनाथ उबाळे, जनार्दन कांबळे, गणेश कोलते आदींच्या उपस्थितीत पार पडले.
समारोप प्रसंगी यशवंत विद्यालय मावडी कडेपठार भागशाळा पांडेश्वरचे मुख्याध्यापक भालेराव, जवळार्जुन न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक उत्तमराव निगडे यांच्या हस्ते विजेत्या संघाचा,
मार्गदर्शक क्रीडा शिक्षक, व्यवस्थापक यांचा सुद्धा सत्कार केला. स्पर्धेचे नियोजन क्रीडा व्यवस्थापक कांतीलाल कोलते यांनी तर सूत्रसंचालन बाबूराव गायकवाड यांनी केले.
वयोगटनिहाय प्रथम तीन विजेते मुला-मुलींचा संघ (गाव)
14 वर्षे (मुले) : भैरवनाथ विद्यालय (वनपुरी), यशवंत यशवंत विद्यालय (मावडी कडेपठार), वाघिरे हायस्कूल (सासवड). (मुली) : भैरवनाथ विद्यालय (वनपुरी), न्यू इंग्लिश स्कूल (मांडकी), राजुरी माध्यमिक विद्यालय (राजुरी).
17 वर्षे (मुले) : विद्या महामंडळ प्रशाला (कोथळे), माहूर माध्यमिक विद्यालय (माहूर), वाघिरे विद्यालय (सासवड). मुली : यशवंत विद्यालय (मावडी कडेपठर भाग शाळा पांडेश्वर), भैरवनाथ माध्यमिक विद्यालय (वनपुरी), श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल (वीर).
19 वर्षे (मुले) : वाघिरे कॉलेज (सासवड). मुली : न्यू इंग्लिश स्कूल (जवळार्जुन), वाघिरे कॉलेज (सासवड), जिजामाता हायस्कूल (जेजुरी).





