पुणे जिल्हा | मुळशी तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत २३५ खेळाडू सहभागी

पिरंगुट, (वार्ताहर) – मुळशी तालुकास्तरीय शालेय क्रीडा कुस्ती उत्साहात पार पडली. स्पर्धेत यात २८ शाळांमधील १७५ मुले व ६० मुली, अशा एकूण २३५ खेळाडूंनी भाग घेतला. यातील विजेत्या खेळाडूंना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ब माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांच्या वतीने पदक देऊन गौरविण्यात आले.
भरे (ता. मुळशी) येथील मुळशी तालुका क्रिडा संकुलात शालेय कुस्ती स्पर्धा कै. पै.प्रा. सागर तांगडे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा संपन्न झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, मुळशी तालुका क्रीडा शिक्षक संघाच्या सहकार्याने पिरंगुट येथील संस्कार इंग्लिश मिडीयम स्कुलने स्पर्धेचे नियोजन केले होते.
स्पर्धेचे उद्घाटन मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे , राष्ट्रीय तालीम संघ सदस्य स्वस्तिक चोंधे, संस्कार स्कूलच्या प्राचार्या स्नेहा साठे, कुस्ती कोच प्रतिक्षा सुतार आदींच्या हस्ते झाले. कै.प्रा.पै. सागर तांगडे यांना श्रद्धांजली वाहून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
पारितोषिक वितरण माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुळशी तालुका क्रीडा शिक्षक संघ अध्यक्ष सुनिल सातव , उपाध्यक्ष संतोष बनकर ,कार्याध्यक्ष गोरख शहाणे,
खजिनदार बाळासाहेब गायकर, सचिव संदीप पवार, राष्ट्रीय पंच.चंद्रकांत मोहोळ, विठ्ठल मोहोळ, रोहिदास आमले, निलेश मारणे, हनुमंत मणेरे,विक्रम पवळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रतीक्षा सुतार यांनी केले. प्रास्ताविक संदीप पवार यांनी केले. आभार स्नेहा साठे यांनी मानले.
जिल्हास्तरावर निवड झालेले वजन गटनिहाय खेळाडू पुढीलप्रमाणे : १४ वर्षाखालील-मुली : ३६ -अपर्णा भोरडे, ३९-तनया मांडेकर, ४२-श्रेया तांबे, ४६-स्वराली तारू, ५० -वैष्णवी शिंदे, ५४-स्वरा जाधव, ५८-शताक्षी सिरसवट. मुले : ३५-अनुज पिंगळे, ३८-विशाल शाह, ४१-शौर्य ववले, ४४-विराज शेळके, ४८-प्रथमेश गोडांब, ५२ -आदित्य परदेशी, ५७-आयुष ओझरकर, ६२ साहिल जाधव, ६८-समर्थ गोडांबे.
१७ वर्षाखालील मुली : -४०-श्रद्धा सोटे, ४३-प्राची जाधव, ४६- हर्षदा बलकवडे, ४०-श्रेया परदेशी, ५३-रूपाली वाघ, ५७-प्रियांसी गाढवे, ६१-प्रीती शिर्के, ६५-श्रद्धा पवार, ६९-संस्कृती सुतार, ७३-वैभवी फरांदे. मुले :(फ्रीस्टाइल) : ४१-४५-स्वराज शिंदे,
४८-समर्थ दाभाडे, ५१-रुद्र लांडगे, ५५-शिवम महाले, ६०-ऋग्वेद मोरे, ६५-सक्षम ववले, ७१-नैतिक सोनवणे, ८०-यज्ञ मिरगे, ९२-सोहम कुंभार, ११०-रणजीत मातेरे. (मुले- ग्रीको रोमन) : ४१-४५-आझाद घाडगे, ४८-राजू गाढे, ५१-रुद्र मारणे, ५५-सार्थक बोडके, ६०-सिद्धेश जोरी,
६५-जयराज ठाकर, ११०-रुद्र निम्हण.
१९ वर्षाखालील मुली : ५०-मानसी फुलसुंदर, ५३-श्रावणी पांचाळ, ५५-शर्वरी गोसावी,५७-समीक्षा केळगावकर, ५९-अक्षयनी माने, ६२-आदिष्टी काळे, ६५-सृष्टी भालेकर, ६८-तनिष्का सैंदाणे, ७२-नीरजा निकम, ७६-रिद्धी पासलकर.
मुले (फ्रीस्टाइल) : ५७-कार्तिक मारणे, ६५-संकेत मारणे, ७०-ऋषिकेश भोईर, ७४-विश्वजीत भरकडे, ८६-स्वराज ववले. मुले (ग्रीको रोमन) ५५-कुणाल मालपोटे, ६०-निखिल खैरे, ७७-ओम भालेराव, ८२-हर्ष मोहिते,





