Pune: आयसीएसई दहावी परीक्षेत विद्या प्रतिष्ठानच्या मगरपट्टा सिटी पब्लिक स्कूलचे यश
Pune:
Updated On:

Pune: मगरपट्टा सिटी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयसीएसई दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. मगरपट्टा सिटी पब्लिक स्कूलने शंभर टक्के निकालाची परंपरा राखली असून प्राचार्या चंद्रिका बॅनर्जी यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे या यशासाठी अभिनंदन केले.
शाळेत दहावीच्या परीक्षेत विधी हिरे हिने पहिला क्रमांक पटकावत ९९.२ टक्के गुण मिळवले आहेत. दुसरा क्रमांक रिया राजभूत हिने पटकावला असून तिला ९९ टक्के गुण मिळाले आहेत. तर यश बोरकर व अबीर नायक या दोघांनीही ९७.२ टक्के गुण मिळवित तिसरा क्रमांक पटकावला आहे. ११७ पैकी विद्यार्थ्यांनी ६२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.





