Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान अपघातात निधन झाले असून आज त्यांच्यावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतिमामात अत्यंसंस्कार होणार आहेत. आज सकाळी ११ वाजता अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र शोकसागरात बुडाले आहे. अजित दादांच्या अकाली एक्सिट सर्वांनाच धक्का देणारी आहे. अजित पवार यांची राजकीय कारकीर्द झंझावाती ठरली. त्यांनी सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री पद भूषविले. राज्याचा अर्थसंकल्प देखील अजितदादांनी विधिमंडळात अनेकदा सादर केला. यासोबतच अजित पवार यांच्या राजकीय सभांचेही रेकॅार्ड आहे. त्यांनी अनेक सभा, प्रचार दौरे केले. झंझावाती कारकीर्दीत त्यांनी अनेक सभा गाजवल्या. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पार पडलेल्या सभेपासून झाली. त्यांनी या मैदानावर अनेक सभा घेतल्या. मात्र, आज त्याच मैदानावर त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. बारामतीत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देशाचे गृहमंत्री यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, पदाधिकारी आदी नेते उपस्थित राहणार आहेत. अजित पवार आपल्यात नाहीत या गोष्टीवर अजूनही अनेकांचा विश्वासच बसत नाही. अजित पवार यांंच्या अनेक सभा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पार पडल्या. विद्या प्रतिष्ठान हे अजित पवार यांच्या खूप जवळचे संबंध असलेले ठिकाण आहे. ते येथील संस्थेचे विश्वस्त होते. त्यांचा विकासात मोठा वाटा राहिलेला आहे. येथे २०२५ मध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत वार्षिक सभा पार पडली होती. याशिवाय अजित पवार यांची सभा, निवडणुकीचा प्रचार, रॅली विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर किती वेळा पार पडल्या आहेत. अजित पवार यांच्यावर आज सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. विद्या प्रतिष्ठान मैदानावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, बारामतीकर हजारोंच्या संख्येनेआल्याने मैदानावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. हेही वाचा : Ajit Pawar: उत्कर्ष शिंदेने व्यक्त केल्या अजित पवार यांच्या आठवणी; म्हणाला, “पवार परिवारासोबतच्या अशा आठवणी आयुष्यभर स्मरणात राहतील…”