KGF 3 मधून यशचा पत्ता कट

KGF 3 । जेव्हा केजीएफचे नाव घेतले जाते तेव्हा रॉकिंग स्टार यशचीही आठवण येते. त्याच्याशिवाय हा चित्रपट अपूर्ण आहे. असं समीकरण चाहत्यांमध्ये आहे. केजीएफ असो किंव चित्रपटाच्या भाग २ दोन्ही चित्रपटांना लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
चाहते KGF 3 चित्रपटाचीच प्रतीक्षा बघत आहे. प्रशांत नील यांनीही हा चित्रपट बनवण्याचे संकेत दिले आहे. प्रशांत नील KGF च्या पुढील भागावर यश ऐवजी तमिळ सुपरस्टार अजितला घेण्याचे वृत्त आहे.
अजितला ‘KGF 3’ साठी साइन केल्याचे वृत्तात सांगितले जात आहे. रिपोर्ट्समध्ये यशला तिसऱ्या भागातून काढून टाकण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, चित्रपटाच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही
दरम्यान, यशच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, तो टॉक्सिकमध्ये दिसणार आहे. यशसोबत नयनतारा, कियारा अडवाणी आणि हुमा कुरेशी दिसणार आहे. याशिवाय नितीश तिवारी यांचा रामायण हा त्यांच्या खात्यातील दुसरा प्रकल्प आहे. यश चित्रपटाची सहनिर्मिती करत आहे. तसेच, तो या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार आहे.





