Baramati News : बारामतीतील उद्योजकांसाठी दिल्ली येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन

बारामती : बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनतर्फे उद्योजकांसाठी 13 ते 17 मे 2025 दरम्यान नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित इंडिया मशीन टूल्स शो प्रदर्शन पाहण्यासाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.
देशाची राजधानी दिल्लीत देश विदेशातील अत्याधुनिक मशीनरीचे उत्पादक त्यांचे विविध उत्पादने वेळोवेळी प्रदर्शित करत असतात. या प्रदर्शनात देश-विदेशातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त लहान-मोठ्या मशिनरींचे प्रदर्शन होणार आहे. देशातील नामांकित आणि परदेशी कंपन्या सहभागी होणार असल्याने उद्योजकांना जागतिक दर्जाच्या यंत्रसामग्री पाहण्याची संधी मिळेल. स्टार्टअप आणि प्रस्थापित उद्योजकांना उत्पादन प्रक्रिया समजून घेण्यासाठी हा दौरा उपयुक्त ठरणार आहे.
13 मे रोजी बारामतीतील उद्योजकांचे शिष्टमंडळ दिल्लीकडे रवाना होईल आणि प्रदर्शनासह दिल्लीतील प्रेक्षणीय स्थळांना भेट देईल. या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी असोसिएशनचे खजिनदार अंबिरशाह शेख वकील यांच्याशी 9579302303 या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदवण्याचे आवाहन धनंजय जामदार यांनी केले आहे.





