पुणे जिल्हा | महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा डंका

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – येथील महात्मा गांधी विद्यालयव कनिष्ठ महाविद्यलयातील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता 8 वी) 26 विद्यार्थ्यांनी, उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीपरीक्षेत (इयत्ता 5 वी) 11 विद्यार्थ्यांनी तसेच महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये 9 विद्यार्थांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातलेलीआहे.
विद्यालयातील धैर्यशील घोरपडे या विद्यार्थाने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 258 गुण मिळवून राज्यात 25 वा क्रमांक व महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात 12 वाक्रमांक प्राप्त केला आहे. इयत्ता 9 मधील ऋग्वेद नेहेरे यां विद्यार्थाने राज्यात 23 वा क्रमांक व इ. 10 वी तील तन्वी सुपेकर या विद्यार्थीनीने राज्यात 15 वा क्रमांक प्राप्त केला आहे.
इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेस नयना लोखंडे, गुलाब थिटे, स्मिता निकम, शितल ढवळे, मृणाल कुलकर्णी, सोनाली दरेकर, श्वेता तळेकर, ऋतुजा भोंडवे यांनी, इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेस प्रिया कुटे, सुवर्णा कापसे, प्रतिपदा गोरडे, मंगल गावडे, उर्मिला सावंत यांनी मार्गदर्शन केले.
खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, उपाध्यक्ष तथा शाळा समितीचे अध्यक्ष अजित लुणावत, सचिव गणेश जोशी, प्राचार्या संध्या कांबळे, उपमुख्याध्यापक दशरथ पिलगर, पर्यवेक्षक पांडुरंग डावरे, बाळासाहेब गाडेकर, रेखा जाधव, अस्मिता पाठक यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
इयत्ता आठवीतील यशस्वी विद्यार्थी; तनिष्का पाचारणे, स्वयंम बिरादार, हर्षवर्धन पाचारणे, मयांक गारगोटे, स्नेहा खोपे, आर्या गारगोटे, अनुष्का नाईकरे, हर्षद पवळे, अथर्व मनकर, श्रावणी कदम, पूर्वा कोरडे, समृद्धी जाधव, शरयू वाकचौरे, अन्वी टाव्हरे, आदेश सांडभोर, सुदर्शन राऊत,
वेदिका पाटील, संकल्प गटे, प्रतीक देशमाने, उदय रेटवडे, प्रतीक्षा देशमाने, संचिता तळपे, पूर्वा एरंडे, अपेक्षा गोपाळे, दर्शन शिंदे. इयत्ता पाचवीतील यशस्वी विद्यार्थी ; श्रेयस गोरडे, सिद्धिका कुरणावळ, विघ्नेश सांडभोर, स्वराज जाधव, श्रेयस वडणे, ऋग्वेद निकम, शरयू बोर्हाडे, अर्णव वाघमारे, आनंद खोल्लम, राजवीर थिटे, संस्कार घोडे.
एमटीएस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी
आदेश सांडभोर (8 वी जिल्ह्यात 4 था), वेदांत हिरवे (9 वी जिल्हात 6 वा), कनुप्रिया सांडभोर (जिल्ह्यात 5 वा). या विभागाचे काम सुभाष जैद, वर्षा भोसले यांनी केले.





