प्रत्येक बालक सशक्त करण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई – प्रत्येक बालक सशक्त असण्याबरोबरच या मुलांना सक्षम व कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. ही दिवाळी सर्वांच्या आयुष्यात चैतन्य आणि ऊर्जेचे पर्व घेऊन येवो अशी मनोकामना महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली.
दिवाळीनिमित्त महिला बालविकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी माटुंगा येथील द बेहेरामजी जीजीभॉय होम फॉर चिल्ड्रेन व श्रद्धानंद बालगृह या संस्थांना भेट दिली आणि बालगृहातील मुलांसमवेत दिवाळी साजरी केली. त्यावेळी ते बोलत होते.
लोढा यांनी यावेळी, बालगृहातील मुलांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या. ही दिवाळी या मुलांच्या आयुष्यात सुख, समृद्धी भरभराट घेऊन येवो, अशी मनोकामना व्यक्त केली.
राज्यातील प्रत्येक बालकाला निरामय आरोग्य लाभावं, यासाठी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. बालकांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून शासन यापुढे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेणार असल्याचेही लोढा यांनी यावेळी सांगितले.





