अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकट करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता -पंतप्रधान

नवी दिल्ली : जगात करोना व्हायरस पसरत असताना भारताने योग्य पावले उचलली असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते सीआयआयला १२५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमा उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी लॉकडाउनच्या काळात घेतलेले निर्णय दीर्घकाळाच्या दृष्टीने देशाच्या हिताचे ठरतील असे मोदी म्हणाले.
Intent, Inclusion, Investment, Infrastructure and Innovation— these five things are important to speed up India’s development and make it ‘atmanirbhar’. You will get a glimpse of these in the bold decisions recently taken by us: PM Narendra Modi pic.twitter.com/vcZpx5BcEl
— ANI (@ANI) June 2, 2020
करोना व्हायरस विरुद्ध लढताना अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकट करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यासाठी सरकारने तात्काळ आवश्यक पावले उचलली. दीर्घकाळाच्या दृष्टीने देशाच्या हिताचे ठरतील असे अनेक निर्णय घेतले आहेत.
#WATCH World is looking for a trusted, reliable partner. In India, we have potential, strength & ability. Today, all of you, including all the industries must benefit from the trust that has developed for India all over the world: PM pic.twitter.com/aCIU63DI8D
— ANI (@ANI) June 2, 2020
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत ५३ हजार कोटींची आर्थिक मदत देण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. सुधारणांसंबंधींचे निर्णय असेच घेतलेले नाहीत. एक निश्चित विचार करुन भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेतले आहेत असे मोदी म्हणाले.
भारताची क्षमता, प्रतिभा, टेक्नोलॉजी, संकट व्यवस्थापन, कल्पकता, शेतकरी आणि इंडस्ट्रीचे नेतृत्व करणाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे भारत निश्चित विकासाच्या मार्गावर परतेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. करोनामुळे आपला वेग कितीही धीमा झाला असला तरी, भारताने लॉकडाउनला मागे सोडून अनलॉक फेज १ मध्ये प्रवेश केला आहे. अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा सुरु झाला आहे. आठ जूननंतर त्यामध्ये अधिक गती येईल” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.





