अनुराग ठाकुर यांचे भाषण सुरू होताच सभागृहात घोषणाबाजी
नवी दिल्ली : काही दिवसापुर्वी भाजपचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी देशद्रोह्यांना गोळ्या घालण्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचेच पडसाद आज संसदेत उमटल्याचे पहायला मिळाले. जामिया मिलिया विद्यापीठाच्या परिसरातील गोळीबार आणि वादग्रस्त घोषणाबाजीचे परिणाम अनुराग ठाकूर यांना सहन करावे लागले. कारण ठाकूर आज लोकसभेमध्ये भाषणासाठी उभे राहताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोली मारना बंद करो; देश को तोडना बंद करो अशी घोषणाबाजी सुरु केली.
#BudgetSession2020: Opposition MPs raise ‘Goli maarna band karo’ slogans as MoS Finance Anurag Thakur speaks in Lok Sabha. pic.twitter.com/81ioZiUIGc
— ANI (@ANI) February 3, 2020
सभागृहात अनुराग ठाकूर भाषण करण्यासाठी उठल्यानंतर एकच गोंधळ घातला तसेच घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला घोषणाबाजी करणाऱ्या खासदारांना शांत राहण्याचे आवाहन करत होते. तुम्हाला लोकांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पाठवले आहे, घोषणाबाजी करण्यासाठी नाही असे ओम बिर्ला यांनी खासदारांना सुनावले. तरीही घोषणाबाजी सुरुच होती.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी भाषण करताना अनुराग ठाकूर यांनी, देश के गद्दारो को, गोली मारो अशा चिथावणीखोर घोषणा देण्यासाठी उत्तेजन दिले होते. त्याचेच पडसाद आज संसदेत उमटले. सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे.