Kangana Ranaut : ‘आगीत तेल ओतणं थांबव आणि योग्य गोष्टींना पाठिंबा दे’; कंगनाने हृतिकला फटकारलं
Kangana Ranaut : या प्रतिक्रियेवर कंगना यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे.

Kangana Ranaut : ‘जेन झीं’वर वादग्रस्त विधान केल्यानंतर अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत या ना त्या कारणामुळे सातत्याने चर्चेत आहेत. सोशल मीडियावर आता ‘आपण हृतिक रोशनची माफी मागितली पाहिजे’ हा ट्रेंड जोर धरू लागला असून त्यावर अभिनेता हृतिक रोशनने प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेवर कंगना यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे.
एककाळ असा होता की कंगना आणि हृतिक यांच्यातील नात्याची चर्चा रंगली होती. दोघेही यामुळे लाइमलाईटमध्ये आले होते. हृतिकेने कंगनाकडून करण्यात आलेले दावे फेटाळून लावले होते. आता पु्न्हा एकदा २०१६ मध्ये घडेलेल्या गोष्टींचा उल्लेख केला जात आहे. ‘आपण हृतिक रोशनची माफी मागावी’ असा ट्रेंड सुरू झाला असून एका बातमीचा स्क्रिनशॅाट कंगना यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
हा स्क्रिनशॅाट कंगना यांनी इंन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला असून, त्यावर प्रतिक्रिया देताना लिहिले की, हृतिक आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद एकत्र चांगले दिसतात, मात्र एखाद्या महिलेविरोधात अशा प्रकारे वातावरण तयार करणे योग्य नाही. तसेच हृतिकने त्याचे नाव वापरून इतरांकडून होणाऱ्या ट्रोलिंग आणि छळाचा निषेध करायला हवा. असं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर जो ट्रेंड सुरू झाला आहे, त्याला अनुसरून कंगनाने पोस्टमध्ये हृतिकला “आगीत तेल ओतणे थांबव आणि योग्य गोष्टींना पाठिंबा दे,” असेही म्हटलं आहे. तसेच निरर्थक वक्तव्ये टाळण्याचा सल्लाही कंगनाने दिला आहे.
असं काय म्हणाला हृतिक?
“एखाद्या व्यक्तीला विरोध करण्यासाठी दुसऱ्याचे समर्थन करणे ही समाजातील मोठ्या समस्येची झलक आहे. सत्य आणि तथ्ये योग्य संदर्भात समोर येण्याची आपण वाट पाहू.” असं वक्तव्य हृतिकने केलं होतं. याच वक्तव्यामुळेचं कंगना यांचा पारा चढला.
नेमकी सुरूवात कशी झाली?
कंगना यांनी सीजेपीवर टीका करताना “बेरोजगार” आणि “बेकार” असे शब्द वापरले होते. यानंतर पार्टीचे सौरव दास यांनी एका मुलाखतीत खास विनोदी शैलीत याला उत्तर दिलं होतं. “कदाचित मी थोडासा तरुण हृतिक रोशनसारखा दिसत असल्यामुळे कंगनाने माझ्यावर निशाणा साधला असावा,” असे ते म्हणाले. येथूनच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट आणि व्हिडिओ कंगना आणि हृतिक यांच्या नात्याच्या चर्चा करणाऱ्या असल्याचे दिसत आहे.
नेमकं २०१६ मध्ये काय घडलं होतं?
२०१६ मध्ये कंगना रणौतने हृतिक रोशनवर तिचा पाठलाग केल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात तिने अभिनेत्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावाही दाखल केला होता. कंगनाचा दावा होता की ती आणि हृतिक रिलेशनशिपमध्ये होते, मात्र हृतिकने हे आरोप स्पष्टपणे नाकारले. त्यानंतर हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला. तपासाच्या प्रक्रियेदरम्यान हृतिकने आपला पासपोर्ट आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे संबंधित यंत्रणांकडे जमा केली होती. दुसरीकडे, कंगनाने तिची उपकरणे पाण्यामुळे खराब झाल्याचे सांगत ती तपासासाठी उपलब्ध करून दिली नव्हती.





