Rahul Gandhi : “जेन झीला घाबरवून शांत करू शकत नाहीत..”; राहुल गांधी यांचा मोदी, शहांना इशारा
मोदी आणि शहा जेन झीला घाबरवून शांत करू शकत नाहीत. सर्वांत प्रथम जेन झीची हाडे मोडण्यात आली. आता त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

Rahul Gandhi – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी जेन झीवरील कारवाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना इशारा दिला. तसेच, त्यांचा उल्लेख भारताचा भूतकाळ म्हणून केला.
मोदी आणि शहा जेन झीला घाबरवून शांत करू शकत नाहीत. सर्वांत प्रथम जेन झीची हाडे मोडण्यात आली. आता त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
त्यांची सोशल मीडिया अकाऊंटस् बंद केली जात आहेत. तुम्ही (मोदी आणि शहा) भारताचा भूतकाळ आहात. भारताच्या भविष्याला (जेन झी) हाताळताना काळजी घ्या, असे इशारेवजा आवाहन राहुल यांनी सोशल मीडियावरून केले.
कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) माध्यमातून जेन झी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थी दशेतील युवक-युवतींनी नुकतेच आंदोलन केले. त्या आंदोलकांवरील कारवाईवरून संसदेतील आणि संसदेबाहेरील वातावरण तापले आहे.
विरोधी पक्ष आणि प्रामुख्याने कॉंग्रेसने त्या कारवाईचा निषेध करत आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्यातून राहुल आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी मोदी, शहांना घेरण्याचे सत्र आरंभले आहे.






