अयोध्येला जात असलेल्या विशेष गाडीवर दगडफेक
Updated On:

गांधीनगर – गुजरातच्या सूरत येथून उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे निघालेल्या विशेष रेल्वेगाडीवर महाराष्ट्रातील नंदुरबार येथे दगडफेक झाल्याची बातमी आहे. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मात्र त्यात कोणी जखमी झाले नसल्याचे वृत्त आहे.
एएनआयने दिलेल्या बातमीनुसार नंदुरबारचे डीएसपी संजय महाजन म्हणाले आस्था विशेष रेल्वे गाडीवर रात्री पावणे अकराच्या सुमारास दगडफेक झाली. झाल्या प्रकारामुळे प्रवशांनी तातडीने खिडक्या बंद केल्या.
मात्र काही दगड आत पडले होते. रविवारी रात्री ८ वाजता ही गाडी अयोध्येकडे निघाली असून गाडीत १३४० भाविक आहेत. अयोध्येत २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाली असून अयोध्येला दर्शनासाठी जाउ इच्छीणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेकडून विशेष आस्था गाड्या चालवल्या जात आहेत.





