Stock Market News | – परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करत असले तरी भारताची स्थूल अर्थव्यवस्था भक्कम असल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आगामी काळात आणखी वाढत राहतील असे वाटणार्या गुंतवणूकदारानी खरेदी चालू ठेवल्यामुळे सलग तिसर्या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. याचा फायदा महिंद्रा, एचडीएफसी बँक, स्टेट बँक, एनटीपीसी, पावर ग्रीड, एशियन पेंट्स, विप्रो या कंपन्यांना झाला.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 227 अंकांनी वाढून 72,050 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 70 अंकांनी म्हणजे 0.32 टक्क्यांनी वाढून 21,910 अंकावर बंद झाला.
तेल आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा, वाहन, दूरसंचार या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली. तर ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्यामुळे या क्षेत्राचा निर्देशांक घसरला. स्मॉल कॅप सव्वा टक्क्यांनी तर मिडकॅप एक टक्क्याने वाढला. याचा अर्थ अजूनही गुंतवणूकदार मोठ्या कंपन्यापेक्षा छोट्या कंपन्यांच्या शेअरची जास्त खरेदी करीत आहेत. सध्याचे तेजीच्या काळातही अॅक्सिस बँक, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले, सन फार्मा या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
Gold Silver Rates | सोन्याची घसरण चालूच तर चांदीच्या दरात वाढ…
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस या कंपनीचे संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले की, पुन्हा बरेच गुंतवणूकदार सरकारी कंपन्यांच्या शेअरची खरेदी करीत आहेत. त्यातल्या त्यात तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जास्त खरेदी झाली.
Japan and UK Face Recession : उत्पादकता कोसळल्याने जपान आणि ब्रिटनमध्ये मंदी…
परदेशात महागाई जास्त असली तरी भारतातील महागाई खात्रीने नियंत्रणात असल्याची आकडेवारी गेल्या आठवड्यात जाहीर झाली आहे. यामध्ये किरकोळ आणि घाऊक किमतीवरील आधारित महागाईचा समावेश आहे. त्यामुळे भारताबाबत गुंतवणूकदार जास्त आशावादी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी पुन्हा विक्री सुरू केली असून काल या गुंतवणूकदारांनी 3,929 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. हे गुंतवणूकदार कमी अधिक प्रमाणात मध्यम पल्ल्यात गुंतवणूक कमी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.