Stock Market Fell : गुंतवणूकदारांना मोठा फटका, 18.74 लाख कोटींचे नुकसान
Updated On:

मुंबई – महागाई व व्याजदर वाढीमुळे गेल्या पाच दिवसात शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे या कालावधीत गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य 18.74 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
या पाच दिवसात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स पाच टक्क्यांनी म्हणजे 2,771 अंकांनी कोसळला. त्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रीत बाजार मूल्य कमी होऊन 240 लाख कोटी रुपये झाले आहे.
सकाळी अमेरिकेतील महागाई वाढली असल्याचे आकडेवारी झाल्यामुळे जागतिक बाजारात नकारात्मक वातावरण होते. संध्याकाळी भारतीय महागाईचा दर वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली. त्यामुळे आगामी काळातही शेअर बाजारात नकारात्मक वातावरण राहणार आहे.





