Rupali Chakankar : ‘अजूनही विश्वास बसत नाही…’; अजितदादांच्या जयंतीनिमित्त रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट
Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावरुन अजितदादांसाठी एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

Rupali Chakankar : २८ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रातील इतिहासातील अत्यंत दुर्देवी दिवस म्हणून ओळखला जाणार आहे. या दिवशी महाराष्ट्राचे लाडके सर्वांचे ‘दादा’ अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला.
अजित पवार यांच्या अकाली जाण्याने अनेकांना मोठ्या वेदण्या झाल्या. आज अजित पवार यांचा वाढदिवस अर्थात जयंती असल्याने त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.
सोशल मीडियावरुन त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष आणि माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावरुन अजितदादांसाठी एक भावुक पोस्ट लिहिली आहे.
मनाला प्रचंड वेदना होत आहेत
दादा, गेले सहा महिने आम्ही सर्वजणच प्रचंड अस्वस्थ आहोत, अजूनही विश्वास बसत नाही, महाराष्ट्रातील बहिणींचा ‘भाऊराया’, लहानथोरांचा लाडका “दादा”, कार्यकर्त्यांचा “नेता” असा अष्टपैलू “कामाचा माणूस” सगळ्यांना सोडून निघून गेला. “वाढदिवस” ऐवजी “जयंती” हा शब्द लिहितानाही मनाला प्रचंड वेदना होत आहेत. अशा शब्दांत रुपाली चाकणकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पोस्टमध्ये चाकणकरांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
पोस्टमध्ये रुपाली चाकणकरांनी दादांचा स्वभावच “शिस्तबद्ध आणि काटेकोरपणे आयुष्य जगताना आपल्या राजकारणाचा, समाजकारणाचा फायदा गोरगरीबांना, उपेक्षितांना झाला पाहिजे, त्यांची प्रगती झाली पाहिजे आणि समाज उन्नतीकडे गेला पाहिजे” या प्रखर विचारसरणीचा, असा उल्लेख करत त्यांना आदरांजली पोस्टद्वारे अर्पण केली आहे.
“आज तुमचा दिवस ‘जयंती’ म्हणून मानताना…”; अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांची डोळे पाणवणारी पोस्ट
रुपाली चाकणकरांची पोस्ट
दादा, तुमच्या प्रत्येक वाढदिवसाला आमची लगबग असायची,महिनाभर आधी कार्यक्रमांची तयारी चालायची,संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्हा,तालुका ,वाॅर्डस्तरावर कार्यक्रम देण्यापासून ते पार पडलेत का,इथपर्यंत आम्ही उत्साहाने सहभागी होऊन आनंदाने या वाढदिवसाच्या “उत्सवात”न्हाऊन निघायचो.
दादा,तुमच्या प्रत्येक वाढदिवसाला आमची लगबग असायची,महिनाभर आधी कार्यक्रमांची तयारी चालायची,संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्हा,तालुका ,वाॅर्डस्तरावर कार्यक्रम देण्यापासून ते पार पडलेत का,इथपर्यंत आम्ही उत्साहाने सहभागी होऊन आनंदाने या वाढदिवसाच्या “उत्सवात”न्हाऊन निघायचो.
विशेष… pic.twitter.com/CRMQNUllvs— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 22, 2026
विशेष म्हणजे दादांचा वाढदिवस म्हणजे तो समाजोपयोगी,गरजूंना मदत होणारा आणि शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाणारा असावा, यासाठी प्रत्येक कार्यकर्ता आवर्जून लक्ष देऊन नियोजन करायचा. कारण दादांचा स्वभावच “शिस्तबद्ध आणि काटेकोरपणे आयुष्य जगताना आपल्या राजकारणाचा, समाजकारणाचा फायदा गोरगरीबांना ,उपेक्षितांना झाला पाहिजे,त्यांची प्रगती झाली पाहिजे आणि समाज उन्नतीकडे गेला पाहिजे” या प्रखर विचारसरणीचा.
दादा, गेले सहा महिने आम्ही सर्वजणच प्रचंड अस्वस्थ आहोत, अजूनही विश्वास बसत नाही, “महाराष्ट्रातील बहिणींचा ‘भाऊराया’, लहानथोरांचा लाडका “दादा”,कार्यकर्त्यांचा “नेता” असा अष्टपैलू “कामाचा माणूस” सगळ्यांना सोडून निघून गेला. “वाढदिवस” ऐवजी “जयंती” हा शब्द लिहितानाही मनाला प्रचंड वेदना होत आहेत,पण तुमचे कार्यकर्ते म्हणून तुमचा विचारांचा वारसा पुढे चालवू. काटेवाडी ते महाराष्ट्राचे लौकिक नेतृत्व असा दैदिप्यमान प्रवास करणाऱ्या आमच्या लाडक्या दादाला विनम्र अभिवादन.





